मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

शेतकरी आंदोलनाबाबत ट्वीट करणं भोवलं; दिल्ली पोलिसांकडून ग्रेटा थनबर्गविरोधात कडक कारवाई

शेतकरी आंदोलनाबाबत ट्वीट करणं भोवलं; दिल्ली पोलिसांकडून ग्रेटा थनबर्गविरोधात कडक कारवाई

परदेशी सेलिब्रिटीच्या हस्तक्षेपानंतर देशभरात मोठा गदारोळ झाला आहे

परदेशी सेलिब्रिटीच्या हस्तक्षेपानंतर देशभरात मोठा गदारोळ झाला आहे

परदेशी सेलिब्रिटीच्या हस्तक्षेपानंतर देशभरात मोठा गदारोळ झाला आहे

  • Published by:  Meenal Gangurde

नवी दिल्ली, 4 फेब्रुवारी : भारतात कृषी कायद्यांविरोधात (Agriculture Laws) सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाबाबत (FIR Against Greta Thunberg) पर्यावरण आणि जलवायू परिवर्तनासाठी काम करणारी ग्रेटा थनबर्ग (Greta Thunberg News) हिने केलेल्या ट्वीटमुळे तिच्या अडचणी वाढल्या आहेत. इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार दिल्ली पोलिसांनी ग्रेटा थनबर्ग हिच्याविरोधात एफआयआर दाखल केला आहे. दिल्ली पोलिसांच्या (Delhi Police FIR on Greta Thunberg) सायबर सेलने सेक्शन ग्रेटाविरोधात 153A आणि 120B अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

ग्रेटा थनबर्गने शेतकऱ्यांच्या आंदोलनाचं समर्थन करणारं ट्वीट केलं होतं. या ट्वीटमध्ये तिने लिहिलं होतं की, आम्ही भारतातील शेतकऱ्यांच्या आंदोलनासाठी एकत्र आहोत. यासोबतच त्यांनी दुसऱ्या ट्वीटमध्ये एक डॉक्युमेंट शेअर केला आहे. ज्यात भारत सरकारवर आंतरराष्ट्रीय दबाव आणण्याची कार्ययोजना शेअर केली आहे. यामध्ये पाच टप्प्यात दबाव निर्माण करण्याचं म्हणण्यात आलं होतं. मात्र काही वेळाने त्यांनी हे ट्वीट डिलिट केलं.

हे ही वाचा-400 रुपयांसाठी मैत्रीनं घेतलं शत्रुत्व; विजेच्या खांबाला डोकं आपटून आपटून मारलं

ग्रेटाने डिलिट केलं जुनं ट्वीट

जुनं ट्वीट हटवल्यानंतर ग्रेटा थनबर्ग (Greta Thunberg on India Farmer Protest) हिने एक नवीन ट्वीट केलं आणि अपडेटेड टूलकिट शेयर केलं आहे. नव्या टूलकिटमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत आणि 26 जानेवारी रोजी भारतासह परदेशातही मोठ्या प्रमाणात आंदोलनाचा प्लान हटविण्यात आला आहे. त्या म्हणाल्या की, जर तुम्हाला मदत करायची आहे, तर हा अपडेटेड टूलकिट आहे.

हे ही वाचा-'सबका साथ सबका विकास' योजनेअंतर्गत मोदी सरकार खात्यात पाठवणार 1 लाख? वाचा सत्य

भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलं विधान

शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर परदेशीय व्यक्तीने हस्तक्षेप करण्याविरोधात मंत्रालयाने बुधवारी एक पत्रक जारी केलं आहे. परराष्ट्र मंत्रालयानुसार हे पाहून वाईट वाटलं की, काही संघटना आणि लोक आपला एजेंडा राबवण्यासाठी या प्रकारचं वक्तव्य करीत आहे. कोणत्याही प्रकारचं विधान करण्यापूर्वी सत्य आणि परिस्थिती तपासायला हवी. अशा परिस्थितीत कोणत्याही सेलिब्रिटीद्वारा संवेदनशील ट्वीट करणं वा हॅशटॅग चालविणं जबाबदारीपूर्ण वागणं नाही.

First published:

Tags: Farmer, Farmer protest