कोरोना महासाथीदरम्यान अफगणिस्तानमध्ये लहानग्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. अफगानिस्तानमध्ये (Afghanistan) सुरू असलेल्या गृहयुद्धात सुमारे तीन लाख मुलांना अन्न व पाण्याची सोय न करता या भयानक थंडीत जगण्यास भाग पाडले जात आहे. (Photograph:Reuters)
गृहयुद्धादरम्यान हजारो मुलांना तात्पुरत्या शिबिरात राहावे लागत आहे. निराधार लोकांची मदत करणाऱ्या संघटना त्यांचा एकमेव आधार आहे. (Photograph:Reuters)
बर्फवृष्टीमुळे गरीब कुटुंबातील मुलांवर अत्यंत वाईट परिणाम झाला आहे. त्यांचे कुटुंबीय मुलांसाठी थंडीच्या कपड्यांचं सोडा दोन वेळचं जेवणही देऊ शकत नाहीत. (Photograph:Reuters)
भयंकर थंडीमुळे शाळा मार्चपर्यंत बंद आहे. तेथे मुलांसाठी सरकारी मदत मिळत होती. या देशातील काही भागात तर पारा -27 डिग्री सेल्सियसपर्यंत पोहोचतो. (Photograph:Reuters)
Published by:Meenal Gangurde
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.