भोपाळ, 5 एप्रिल : भोपाल (Bhopal) च्या एका सॉफ्टवेयर इंजीनियर तरुणाची अमेरिकेत (America) गोळी मारून हत्या करण्यात आली आहे. कोरोना गाइड लाइनमुळे मुलाचा मृतदेह भारतात आणता येऊ शकत नाही आणि कुटुंबीयांनाही अमेरिकेत जाण्याची परवानगी दिली जात नाही. व्हिडिओ कॉल करीत या आई-वडिलांनी आपल्या मुलाचं शेवटचं दर्शन घेतलं.
राजधानी भोपाळमधील न्यू सुभाष नगरमध्ये रेहमान याचं कुटुंब राहतं. त्यांचा मुलगा शरीफ फर रेहमान इंजीनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर नोकरी करण्यासाठी अमेरिकेत गेला होता. शरीफ यांची 31 मार्च रोजी रात्रीच्या वेळी तेथील स्थानिक गुंडांनी गोळी मारून हत्या केली.
हे ही वाचा-एकीकडे वडिलांची पेटत होती चिता, दुसरीकडे मुलीने मिळवलं मोठं यश
सांगितलं जात आहे की, शरीफ जेथे राहत होता, त्याच भागात आरोपी मिलर एकाला त्रास देत होता. त्यामध्ये एक लहान मुलगीदेखील होती. शरीफ भांडणं सोडवायला गेला आणि त्याने मुलीची सुटका केली. यानंतर तो आपल्या अपार्टमेंटमध्ये परतला. मात्र मिलरने त्याचा पाठलाग केला आणि अपार्टमेंटच्या समोर शरीफला गोळी घातली. आरोपीने शरीफवर तीन गोळ्या झाडल्या.त्यानंतर जागेवरच त्याचा मृत्यू झाला.
व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून घेतलं शेवटचं दर्शन
मुलाच्या मृत्यूचे वृत्त भोपाळमध्ये राहणाऱ्या कुटुंबाला 31 मार्च रोजी मिळाले. कोरोनाची नियमावली असल्या कारणाने त्यांना अमेरिकेत जाता आलं नाही. 3 दिवसांनंतर शरीफवर अमेरिकेतच अंत्यसंस्कार करण्यात आले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Murder, United States of America