ट्रम्प यांच्या आदेशानंतर चिनी घाबरले; US स्थित अधिकाऱ्यांनी गोपनीय कागदपत्रे जाळली

ट्रम्प यांच्या आदेशानंतर चिनी घाबरले; US स्थित अधिकाऱ्यांनी गोपनीय कागदपत्रे जाळली

चीन आणि अमेरिकेतील तणाव दिवसेंदिवस वाढत असून ट्रम्प यांच्या केवळ एका आदेशामुळे चीन घाबरला आहे.

  • Share this:

वॉशिंग्टन, 22 जुलै : अमेरिका आणि चीनमध्ये तणाव वाढत जात आहे. ट्रम्प सरकारने या पार्श्वभूमीवर एक मोठा निर्णय घेतला आहे. बुधवारी ट्रम्प यांनी चीनला ह्युस्टनस्थित  (Houston Consulate) महावाणिज्य दूतावास 72 तासांत बंद करण्याचा आदेश दिला आहे.

अमेरिकेच्या या आदेशानंतर दूतावासात गोंधळ उडाला आहे. काहींच्या मते अमेरिकेच्या या आदेशानंतर चीनच्या दूतावासात धूर येत असल्याचे दिसत आहे. काहींनी दिलेल्या माहितीनुसार चिनी कर्मचारी गोपनीय कायदपत्रं जाळत आहेत. अमेरिकेच्या या आदेशानंतर चीनदेखील भडकला आहे. आणि या आदेशानंतर प्रत्युत्तर देणार असल्याचं सांगितलं आहे.

हे वाचा-चीनविरोधात 'पुणेरी स्टाईल' बॅनर; ‘परदेशी जातीचे कुत्रे व चिनी माणसांना बंदी'

न्यूयॉर्क टाइम्समधील एका रिपोर्टनुसार ह्युस्टर पोलिसांनीही वाणिज्य दूतावासाच्या बाहेर हजर आहेत. मात्र डिप्लोमॅटिक अधिकारी असल्याकारणाने आत प्रवेश करू शकत नाही. पोलिसांनी सांगितले की काही लोकांनी दूतावासामधून धूर बाहेर पडत असल्याचे पाहिले. याबाबत पोलिसांना कळविण्यात आले होते. मात्र घटनास्थळी पोहोचल्यानंतरही पोलिसांना चिनी अधिकाऱ्यांनी दूतावासात प्रवेश करू दिला नाही. शीतयुद्धानंतर पहिल्यांदा अमेरिकेने कोणताही दूतावास अशा प्रकारे बंद करण्याचे आदेश दिले आहेत. अमेरिकाने चीनसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला आहे.

हे वाचा-चीनविरोधात भारतीय वायुसेना आक्रमक; 5 राफेल लढाऊ विमानं करणार तैनात

गोपनीय फाईल्स जाळल्या जात आहेत

इतक्या कमी वेळात महावाणिज्य दूतावास रिकामी करण्याच्या आदेशानंतर चीनचे परराष्ट्र मंत्रालयात गोंधळ उडाला आहे. अमेरिकेच्या आदेशानंतर चिनी दूतावासाच्या आत गोंधळ उडाला असून वातावरण तणावपूर्ण झालं आहे. इतकचं नाही तर चिनी कर्मचारीही मोठ्या संख्येने गोपनीय कागदपत्रं जाळत असल्याचे दिसून आले आहे. कर्मचारी कागदपत्रं जाळत असल्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

Published by: Meenal Gangurde
First published: July 22, 2020, 4:33 PM IST

ताज्या बातम्या