लंडन, 7 एप्रिल : ब्रिटेनच्या 250 वर्षांच्या इतिहासात बोरिस जॉन्सन (Boris Jhonson) असे पहिले पंतप्रधान आहेत, ज्यांनी पदावर असताना पत्नीशी घटस्फोट घेतला. भारतीय वंशाची त्यांची पूर्व पत्नी मरीना व्हीलर यांनी वर्षाच्या सुरुवातील घटस्फोटाची कागदपत्रं कोर्टात दाखल केली होती. आता या घटस्फोटाला कोर्टातून मंजुरी मिळाली आहे. जॉन्सन यांनी (55) फेब्रुवारीत कैरी सायमंड्स हिच्यासोबत साखरपुड्याची घोषणा केली होती.
गेल्या वर्षी जुलै महिन्यात जॉन्सन यांच्यासह पंतप्रधान आवासात प्रवेश करणारी 32 वर्षीय सायमंड्स हिने बुधवारी (29 एप्रिल) एका बाळाला जन्म दिला. जॉन्सन यांना पूर्व पत्नी व्हीलर यांना चार मुलं आहेत. सांगितले जात आहे की व्हीलर यांना तलाक देण्यासाठी 40 लाख पौंड म्हणजेच तब्बल 37 कोटी 20 लाख रुपयांचा करार करण्यात आला आहे. जॉन्सन यांचा पहिला विवाह अलेग्रा मोस्टीन ओवेन हिच्याशी 1987 मध्ये झाला होता. त्यानंतर 1993 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला.
कैरी सायमंड्स हिच्यासोबत ते पंतप्रधान आवासात राहतात. लग्न न करता ब्रिटनच्या पंतप्रधान निवासस्थानात राहणारं हे पहिलंच जोडपं आहे. तर पंतप्रधान पदावर असताना मुल होणारे जॉन्सन हे तिसरे पंतप्रधान आहेत. या आधी टोनी ब्लेअर यांना 2000मध्ये आणि डेव्हिड कॅमरून यांना 2010मध्ये वडिल बनले होते.
बोरिस जॉनसन यांनी 23 मार्च रोजी ब्रिटनमध्ये 21 दिवसांच्या लॉकडाउनची घोषणा केली आणि 26 मार्च रोजी ते स्वतः कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे दिसून आले. त्यानंतर एप्रिलच्या सुरुवातीला त्याला सेंट थॉमस रुग्णालयात दाखल केले होते. त्यांना 12 एप्रिलला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला होता.
संबंधित -आत्महत्येनंतर महिलेचा ऑडिओ झाला व्हायरल; म्हणाली, मी कोरोना पॉझिटिव्ह आहे...
रशियन महिलेसोबत लग्नासाठी तरुणाने गाठलं शिमला, सप्तपदीच्या आधीच सापडले पोलिसांना