BMW कारला सुसाट मेट्रोने उडवले, तरीही वाचला ड्रायव्हर LIVE VIDEO

BMW कारला सुसाट मेट्रोने उडवले, तरीही वाचला ड्रायव्हर LIVE VIDEO

ही धडक इतकी भीषण होती की, यात कारचा पार चेंदामेंदा झाला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे

  • Share this:

लॉस एंजिल्स, 07 मार्च : 'रेल्वे रूळ ओलांडू नका, रेल्वेच्या फलाटाखालून वाहनं नेऊ नका', अशी सुचना वारंवार जगभरातील रेल्वे प्रशासनाकडून दिली जाते. पण काही महाभाग आपल्या जीवाची परवा न करता नको ते धाडस करतात. असंच धाडस करणे महागाड्या BMW कारचालकाला चांगलेच महागात पडले.

ही घटना अमेरिकेतील लॉस एंजिल्स शहरात घडली आहे. मेट्रोचा ट्रॅक पार करत असताना भरधाव रेल्वेनं BMW कारला जोरात धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, यात कारचा पार चेंदामेंदा झाला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.  लॉस एंजिल्स पोलिसांनीच हा व्हिडिओ ट्वीटरवर शेअर केलं आहे.

एक भरधाव BMW कार मेट्रोच्या ट्रॅक शेजारी येऊन उभी राहिली होती. रेल्वे ट्रॅक न ओलांडण्यासाठी सिग्नलही लागलं होतं. पण,  BMW कार चालकाने सिग्नलकडे कानाडोळा करून ट्रॅकवरून कार पुढे नेण्याचा प्रयत्न केला. नेमकं त्याचवेळी सुसाट वेगाने आलेल्या मेट्रोने कारला जोरात धडक दिली.

KTLA ने दिलेल्या वृत्तानुसार, ही घटना दक्षिण लॉस एंजिल्समधील  मंगलवार सकाळी 11 वाजता घडली. मेट्रोच्या धडकेमुळे कारचा पार चुराडा झाला होता. सुदैवाची बाब म्हणजे, या भीषण दुर्घटनेत कारचालक सुखरूप बचावला. त्याला किरकोळ दुखापत झाली होती.

लॉस एंजिल्स पोलिसांनी या घटनेबद्दल आश्चर्य व्यक्त करत कारचालकांना इशारा दिला आहे. या कारचालकाला रेल्वे ट्रॅकशेजारी सावध करण्यात आलं होतं. सिग्नल लागलं असतानाही त्याने कार पुढे नेण्याचं धाडसं केलं. हेच धाडस त्याच्या जीवावर बेतणारं होतं. सुदैवाने या दुर्घटनेतून कारचालक बचावला आहे. पण, नको ते धाडस तुमच्या जीवावर बेतले असं कृत्य कदापी करू नका, असं आवाहनही पोलिसांनी केलं. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

First published: March 7, 2020, 9:55 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading