14 मुलानंतर दाम्पत्याला झाली मुलगी, लेकीसाठी केली तब्बल 30 वर्ष प्रतिक्षा

14 मुलानंतर दाम्पत्याला झाली मुलगी, लेकीसाठी केली तब्बल 30 वर्ष प्रतिक्षा

या जोडप्याला तब्बल 14 मुलं आहेत. मुलीची प्रतिक्षा करत त्यांनी हा कुटुंब विस्तार केलाय. 7 दिवसांच्या 'मॅगी'चा सर्वात मोठा भाऊ हा 28 वर्षांचा आहे.

  • Share this:

मिशिगन 15 नोव्हेंबर: मुलगाच पाहिजे हा हट्ट भारतीय समाजात खोलवर रुजलेला आहे. वंशाचा दीवा, घराण्याचा वारसा अशा तथाकथित कल्पनेच्या मागे लागून मुलींना गर्भातच संपविण्याचा माणुसकीला काळीमा फासण्याचा प्रकार अजुनही सुरूच आहे. त्यामुळे लोकसंख्येचं प्रमाणच व्यस्त होत असून मुलींची संख्या कमी होत आहे. मात्र अमेरिकेतल्या एका घटनेने सोशल मीडियावर (Social Media) सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. मिशिगन इथल्या एका दाम्पत्याने (Michigan couple has 14 sons) मुलीसाठी तब्बल 30 वर्ष वाट पाहिली. मुलीसाठी त्यांनी 14 मुलं होऊ दिली काही दिवसांपूर्वीच या कुटुंबात मुलीचं आगमन झालं असून तिचं आगमन हा अमेरिकेत चर्चेचा विषय ठरलं आहे. CNNने याबाबतचं वृत्त दिलं आहे.

कॅटरी आणि जे श्वांट हे दाम्पत्या अमेरिकेतल्या मिशिगनमध्ये राहतं. त्यांचं कुटुंब हे तिथे चर्चेचा विषय असतं त्याचं कारणंही तसच खास आहे. या जोडप्याला तब्बल 14 मुलं आहेत. मुलीची प्रतिक्षा करत त्यांनी हा कुटुंब विस्तार केलाय. कॅट आणि जे यांचं 1993मध्ये लग्न झालं. त्या दोघांनीही आता 45मध्ये प्रवेश केला.

कॅटरी आणि जे यांना मुलगी हवी होती. त्यांना पहिला मुलगा झाला. त्यांचा हा पहिला मुलगा आता 28 वर्षांचा आहे. त्यानंतर दुसराही मुलगाच झाला, नंतर तिसराही मुलगाच. पण श्वांट दाम्पत्याला मुलगी हवी होती त्यामुळे त्यांना नंतर मुलगी होईल या आशेवर मुलांना जन्म दिला. आठवडाभरापूर्वी त्यांना मुलगी झाली आणि हे कुटुंब आनंदात बुडून गेलं. त्यांनी तिचं नाव ‘मॅगी’ असं ठेवलं असून मॅगी आणि तिच्या आईची प्रकृती आता उत्तम आहे.

अमेरिकेने घेतला बदला; भररस्त्यात अल-कायदाचा नंबर 2च्या म्होरक्याला मारलं

या दाम्पत्याने 2018मध्ये 14व्या मुलाला जन्म दिला होता. त्यानंतर अनेक वाहिन्यांवर त्यांच्या मुलाखतीही घेतल्या गेल्या. मुलांच्या जन्माच्या आधी आम्ही कधीच टेस्ट करून बाळाचं लिंग बघितलं नाही आणि गर्भपाताचा विचारही कधी मनात आला नसल्याचं त्यांनी सांगितलं.

Published by: Ajay Kautikwar
First published: November 15, 2020, 5:21 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading