ते भयावह 20 तास; मेट्रोमधील वीज गेल्याने प्रवासी अडकले; हजारो नागरिकांचे हाल

ते भयावह 20 तास; मेट्रोमधील वीज गेल्याने प्रवासी अडकले; हजारो नागरिकांचे हाल

फ्रान्समधील या घटनेवर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. अन्न, पाण्याविना प्रवाशांना ट्रेनमध्ये बसावे लागले.

  • Share this:

पॅरिस, 31 ऑगस्ट :  फ्रान्समध्ये रविवारी रात्री हाय स्पीड ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना वीजेअभावी रात्रभर ट्रेनमध्ये अडकून राहावं लागलं. पूर्णपणे बंद ट्रेनमध्ये अडकलेल्या या ट्रेनमध्ये प्रवाशांना पाणी, जेवन आणि बाहेरील हवेअभावी पूर्ण रात्रभर राहावं लागलं. सकाळी जेव्हा वीज आली त्यानंतर त्यांना मदतकार्य देण्यात आलं आणि प्रवाशांना ट्रेनबाहेर काढण्यात आलं.

सोशल साइट्सवर प्रवाशांना व्यक्त केला राग

या ट्रेनमध्ये अडकलेल्या प्रवाशांनी सोशल मीडियावर आपला राग व्यक्त केला. काहींनी जमिनीवर झोपलेल्या मुलांचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले. तर अनेकांनी सातत्याने 20 तासांपर्यंत मास्क लावून राहणं किती आव्हानात्मक असू शकतं, असा सवाल उपस्थित केला. स्थानिक मीडियानुसार अनेक प्रवाशांना रात्रीतून रेस्क्यू करण्यात आलं आहे. नवभारत टाइम्सने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केले आहे.

राष्ट्रीय रेल्वे प्राधिकरणाने मागितली माफी

फ्रान्सच्या राष्ट्रीय रेल्वे प्राधिकरणाने एसएनसीएफने विजेच्या संबंधित या घटनेबाबत सोमवारी माफी मागितली. विजेचा अडथळा रविवारी दुपारपासून सुरू झाला होता, ज्यामुळे फ्रान्सच्या पश्चिमीभागात रेल्वे ठप्प झाली. या कारणाने या भागापासून ते पॅरिसपर्यंत प्रवासाला फटका सहन करावा लागला.

Published by: Meenal Gangurde
First published: August 31, 2020, 10:37 PM IST
Tags: france

ताज्या बातम्या