मराठी बातम्या /बातम्या /विदेश /दुबईत राहणाऱ्या ठाणेकर झाला कोट्यधीश लागली 7 कोटींची लॉटरी, जिंकलेल्या पैशांतून करणार मुलाच्या शिक्षणाचा खर्च

दुबईत राहणाऱ्या ठाणेकर झाला कोट्यधीश लागली 7 कोटींची लॉटरी, जिंकलेल्या पैशांतून करणार मुलाच्या शिक्षणाचा खर्च

Dubai Ganesh Shinde Win Lottery:  दुबईत राहणाऱ्या एका ठाणेकराला दुबईत (UAE) लॉटरी लागली आहे.

Dubai Ganesh Shinde Win Lottery: दुबईत राहणाऱ्या एका ठाणेकराला दुबईत (UAE) लॉटरी लागली आहे.

Dubai Ganesh Shinde Win Lottery: दुबईत राहणाऱ्या एका ठाणेकराला दुबईत (UAE) लॉटरी लागली आहे.

दुबई, 17 जुलै: एक ठाणेकर (Thane) रातोरात कोट्यधीश झालं आहे. दुबईत (Dubai) त्याचं नशीब उजळलं आहे. दुबईत राहणाऱ्या एका ठाणेकराला दुबईत (UAE) लॉटरी लागली आहे. त्याला तब्बल सात कोटींची (Seven Crore) लॉटरी लागली आहे. (Thane Ganesh Shinde Win 7 crore Lottery in Dubai)

दुबईत राहणाऱ्या एका खलाशीला लॉटरीत तब्बल साडे सात कोटी रुपये जिंकले आहे. गल्फ न्यूजनं दिलेल्या एका रिपोर्टनुसार, खलाशी गणेश शिंदे (Ganesh Shinde) असं लॉटरी (Wins Lottery) जिंकणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे. गणेश महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यात राहणारा आहे. गणेश हा सीमॅन असून एका कंपनीत खलाशी (Seaman) म्हणून कामाला आहे.

गल्फनं दिलेल्या वृत्तानुसार, शिंदेनं एका वेबसाईटहून जॅकपॉटचं तिकीट खरेदी केलं होतं. ज्यावेळी या जॅकपॉटचं ड्रा निघालं तेव्हा गणेश जिंकला. शिंदे ज्या कंपनीत काम करतो. ती कंपनी ब्राझिलची आहे.

सतर्क रहा! लस घेतल्यानंतर ही लक्षणं आढळल्यास जराही दुर्लक्ष करु नका

शिंदे यांचं बऱ्याचदा ब्राझिलला ये-जा सुरु असतं. आताही गणेश शिंदे ब्राझिलमध्ये आहे. ब्राझिलमध्ये पोहोचल्यावर ही आनंदाची बातमी समजली.

36 वर्षीय गणेश शिंदे यांनी 16 जूनला जॅकपॉट तिकीट खरेदी केलं होतं. शिंदे यांनी स्वप्नात देखील या लॉटरी जिंकेनं असा विचार केला नव्हता. लॉटरी लागण्यानंतर शिंदे म्हणाले की, अजूनही मी निशब्द आहे. माझ्यासाठी ही खूप मोठी संधी आहे. माझ्यासाठी खूप आनंदाचा क्षण आहे. मी खूप खूश आहे आणि दुबई ड्युटी फ्रीचा मी खूप आभारी आहे.

दुहेरी हत्याकांडानं हादरलं पुणे; हॉटेल मालकानं केलेल्या हत्येनं खळबळ

गेल्या दोन वर्षांपासून आपण नियमितपणे लॉटरीची तिकिटे खरेदी करत असल्याचंही त्यांनी सांगितले. शिंदे म्हणाले की, या पैशातून मी एक नवीन कार, एक नवीन अपार्टमेंट खरेदी करेन आणि मुलाच्या शिक्षणामध्येही पैसे गुंतवेन.

First published:
top videos

    Tags: Dubai, Lottery, Thane, Viral