Home /News /videsh /

कोरोनामुळे जनता संकटात, अन् राजा 24 महिलांना घेऊन झाला फरार

कोरोनामुळे जनता संकटात, अन् राजा 24 महिलांना घेऊन झाला फरार

प्रत्येक देश कोरोनाच्या संकटातून वाचण्यासाठी प्रयत्न करत आहे. मात्र थायलंडचा वादग्रस्त राजा महा वजिरलॉंगकोर्न हा जनतेला टाकून फरार झाला आहे.

    बँकॉक, 30 मार्च : कोरोनामुळं जगभरात हाहाकार माजला आहे. प्रत्येक देश या संकटातून वाचण्यासाठी प्रयत्न करत आहे. मात्र थायलंडचा वादग्रस्त राजा महा वजिरलॉंगकोर्न उर्फ ​​रामदशम यांने संकटात असलेल्या जनतेला टाकून फरार झाला आहे. थायलॅंडमध्ये 1,388 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर, 7 लोकांचा मृत्यू झाला आहे. अशा परिस्थितीत लोकांना संकटात टाकून राजा रामदशम जर्मनीत पळाला आहे. या राजाने जर्मनीत एक लक्झरी हॉटेल बनवून त्याला आपला 'किल्ला' घोषित केले आहे. सध्या 24 महिलांसह हा राजा येथे राहत आहे. या राजाने आपल्या नोकरांनाही आपल्याबरोबर घेतले आहे. जर्मनीच्या अल्पाइन रिसॉर्टमधील लक्झरी हॉटेलमध्ये राजा आयसोलेशनमध्ये राहत आहे. असे सांगितले जात आहे की राजाने संपूर्ण हॉटेल बूक केले आहे. एवढेच नव्हे तर त्यासाठी त्यांनी जिल्हा परिषदेकडून 'विशेष परवानगी' घेतली आहे. वाचा-Lockdown:लेकराच्या पार्थिवाचं अत्यंदर्शन घ्यावं लागलं VIDEO CALLवर, वडील म्हणाले 24 महिलांना घेऊन फरार बिल्ड या जर्मन वृत्तपत्राच्या वृत्तानुसार, राजासोबत 20 महिला आणि मोठ्या संख्येने नोकर आहेत. राजाबरोबर त्याच्या 4 बायका आहेत की नाही हे समजू शकले नाही. कोरोना विषाणूच्या पाश्र्वभूमीवर या भागात हॉटेल आणि गेस्ट हाऊसेस बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. परंतु जिल्हा परिषदेने या राजाला विशेष परवानगी दिली आहे. कोरोनाचा संसर्ग झाल्याच्या संशयावरून राजाने 119 कुटुंबातील सदस्यांना पुन्हा थायलंडला पाठवले असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, राजाने कोरोना संकटात सोडून परदेशात पलायन केल्यामुळे देशातील हजारो लोक संतापले आहेत. वाचा-कोरोनाला रोखण्यासाठी 'या' देशाचा हायटेक प्लॅन, शहरभर लावले 1 लाख CCTV थायलंडमध्ये रुग्णांची संख्या वाढली थायलंडमध्ये 1,388 लोकांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. फ्रान्समध्ये हद्दवाढ झालेल्या मानवाधिकार कार्यकर्ते सोमासक जेमित्रसकुल यांनी फेसबुकवर लिहिले की या राजा महा यांनी प्रथम स्वित्झर्लंडचा प्रवास केला होता आणि त्यानंतर ते सध्या जर्मनीला आहे. थायलंडचे राजा महा फेब्रुवारीपासून आपल्या देशाबाहेर गेले आहेत. या राजाने 4 लग्न केले असून त्यांना 7 मुले आहेत. वाचा-कोरोनाला हरवण्यासाठी हायस्पीड ट्रेन झाली अ‍ॅम्बुलन्स, 300KM वेगाने रुग्ण पोहचणार रुग्णालयात
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Corona

    पुढील बातम्या