चर्चमध्ये अंदाधूंद गोळीबार, दोघांचा मृत्यू, पोलिसांनी हल्लेखोराला घातल्या गोळ्या

चर्चमध्ये अंदाधूंद गोळीबार, दोघांचा मृत्यू, पोलिसांनी हल्लेखोराला घातल्या गोळ्या

टेक्सस राज्यातील व्हाइट सेटलमेंट शहरातील एका चर्चमध्ये (Church) झालेल्या अंदाधूंद गोळीबारात दोघांचा मृत्यू झाला आहे.

  • Share this:

ह्यूस्टन,30 डिसेंबर: अमेरिकेतील (America) टेक्सस राज्यातील व्हाइट सेटलमेंट शहरातील एका चर्चमध्ये (Church) झालेल्या अंदाधूंद गोळीबारात दोघांचा मृत्यू झाला आहे. तसेच एक जण गंभीर जखमी झाला आहे. रविवारी स्थानिक वेळेनुसार सकाळी 10 वाजता वेस्ट फ्रीवे चर्च ऑफ क्राइस्टमध्ये अज्ञात हल्लेखोरांनी अंदाधूंद गोळीबार केली. पोलिसांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. त्यात एक हल्लेखोर ठार झाला आहे.

अम्बुलेंस सेवा मेडस्टार मोबाइल हेल्थकेअरचे प्रवक्ता मकारा ट्रस्टी यांनी सांगितले की, या घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला आहे. गंभीर जखमी झालेल्या एकावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.फोर्ट वर्थ फायर डिपार्टमेंटचे माइक ड्रिव्हदहल यांनी सांगितले की, परिस्थिती नियंत्रणात आहे. पोलिसांनी दिलेल्या प्रत्युत्तरात शस्त्रधारी तीनपैकी एक हल्लेखोर ठार झाला आहे.

या ठिकाणी दोन वर्षांपूर्वी एका बंदूकधारीने सदरलंड स्प्रिंग्सच्या चर्चमध्ये आग लावली होती. व्हाइट सेटलमेंटपासून जवळपास 150 किलोमीटर अंतरावर एक समुदायातीस किमान 26 जणांची हत्या करण्यात आली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 30, 2019 10:02 AM IST

ताज्या बातम्या