मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

भयंकर! दहशतवाद्यांनी 110 नायजेरियन नागरिकांचा केला शिरच्छेद

भयंकर! दहशतवाद्यांनी 110 नायजेरियन नागरिकांचा केला शिरच्छेद

हा भयंकर प्रकार नायजेरियामध्ये घडल्याची माहिती मिळाली आहे. दहशतवाद्यांनी या वेळी शेतकरी आणि मासेमारी करणाऱ्या लोकांना लक्ष्य केलं.

हा भयंकर प्रकार नायजेरियामध्ये घडल्याची माहिती मिळाली आहे. दहशतवाद्यांनी या वेळी शेतकरी आणि मासेमारी करणाऱ्या लोकांना लक्ष्य केलं.

हा भयंकर प्रकार नायजेरियामध्ये घडल्याची माहिती मिळाली आहे. दहशतवाद्यांनी या वेळी शेतकरी आणि मासेमारी करणाऱ्या लोकांना लक्ष्य केलं.

  • Published by:  Kranti Kanetkar

मैदूगुरी, 30 नोव्हेंबर : जगभरात कोरोनामुळे आधीच दहशत पसरलेली असताना आता दहशतवाद्यांकडून देखील हल्ले आणि कुरापती सुरू झाल्या आहेत. भारतात 26 नोव्हेंबरला हल्ला करण्यात आला तर रविवारी अफगाणिस्तानमध्ये देखील सुरक्षा दलावर IED भरलेल्या कारनं स्फोट घडवून आणण्यात आला. तर सोमवारी दहशतवाद्यांनी 110 लोकांचा शिरच्छेद करून दहशत पसरवली आहे. मिळालेल्या माहितीनुसार यामध्ये शेतकरी आणि मासेमारी करणारे नागरिक असल्याची माहिती मिळाली आहे.

हा भयंकर प्रकार नायजेरियामध्ये घडल्याची माहिती मिळाली आहे. दहशतवाद्यांनी या वेळी शेतकरी आणि मासेमारी करणाऱ्या लोकांना लक्ष्य केलं. डेली मेलनं दिलेल्या वृत्तानुसार नायजेरियात दहशतवाद्यांनी 110 जणांची हत्या केली आहे. निर्घृणपणे शिरच्छेद करत या लोकांची हत्या केली आहे. बोको हराम या संघटनेला या हल्ल्यासाठी जबाबदार धरण्यात आलं आहे. या हल्ल्यात अनेक जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

हे वाचा-भिकारी समजून शोरूममधून बाहेर काढलं, त्याच व्यक्तीने विकत घेतली 12 लाखांची बाईक

मिळालेल्या माहितीनुसार दहशतवाद्यांनी या मृत लोकांच्या पत्नी आणि मुलांना बंदी बनवलं आहे. ही धक्कादायक घटना नायजेरियाती बोर्नो राज्यात घडली. रविवार या मृत नागरिकांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. या वर्षात निष्पाप लोकांचा अशा प्रकार दहशतवाद्यांनी जीव घेतला हे अत्यंत दु:खद आणि धक्कादायक आहे. या वर्षातील दहशतवाद्यांनी केलेला हा सर्वात मोठा हल्ला आहे. दहशतवाद्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी एडवर्ड कॅलन यांनी केली आहे.

हे वाचा-मुक्या जीवाला मारताच शिकारीच झाला बंदुकीचा शिकार; नेमकं काय घडलं पाहा VIDEO

संयुक्त राष्ट्र संघटनेचे समन्वयक एडवर्ड कॅलन म्हणाले की, सशस्त्र हल्लेखोर मोटारसायकलींमधून आले होते. सुरुवातीला केवळ 43 मृतदेह सापडले, परंतु नंतर शनिवारी आणखी 70 जणांचे मृतदेह सापडल्यानं मोठी खळबळ उडाली. नायजेरियाच्या राष्ट्रपतींनी दिलेल्या माहितीनुसार दहशतवाद्यांनी केलेल्या या हल्ल्यात जवळपास संपूर्ण देशातील नागरिक जखमी झाले आहेत. या आधी मागच्या महिन्यात बोको हराम संघटनेनं 22 शेतकऱ्यांची निर्घृण हत्या केल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली आहे. या घटनेमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी खळबळ उडाली आहे.

First published: