BIG NEWS: मुंबईवरच्या 26/11 हल्ल्यातल्या सहभागाची पाकिस्तानने दिली पहिल्यांदाच कबुली

BIG NEWS: मुंबईवरच्या 26/11 हल्ल्यातल्या सहभागाची पाकिस्तानने दिली पहिल्यांदाच कबुली

हल्ल्यासाठी जे दहशतवादी समुद्र मार्गाने भारतात आले होते त्या सर्वांसाठी बोट खरेदी करणं. त्यासाठी लागणारं साहित्य खरेदी करणं, त्यांच्या जाण्यासाठी सुरक्षित मार्ग तयार करणं अशी सगळी तयारी या 11 जणांनी केली होती.

  • Share this:

इस्लामाबाद 11 नोव्हेंबर: मुंबईवर 26/11ला झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात (26/11 Mumbai terrorist attack) मदत करणारे 11 जण हे पाकिस्तानमधले(Pakistan) असून ते लष्कर ए तोयबाचे असल्याची खळबळजनक कबुली पाकिस्तानच्या Federal Investigation Agency (FIA) ने पहिल्यांदाच दिली आहे. या सर्व दहशतवाद्यांना Most Wanted लिस्ट मध्ये टाकण्यात आलं आहे. आंतरराष्ट्रीय दबावामुळे पाकिस्तानने हजार पेक्षा जास्त दहशतवाद्यांची यादी जाहीर केली असून त्यात या 11 जणांचा समावेश आहे. या सर्वांनी हल्ल्यासाठी स्थानिक पातळीवर सगळी तयारी केली होती. मात्र या यादीत लष्करे ए तोयबाच्या म्होरक्यांचा समावेश नाही.

मात्र आंतरराष्ट्रीय समुदायाच्या डोळ्यात धुळफेक करण्यासाठी पाकिस्तानने ही यादी तयार केली असल्याचं बोललं जात आहे.

हल्ल्यासाठी जे दहशतवादी समुद्र मार्गाने भारतात आले होते त्या सर्वांसाठी बोट खरेदी करणं. त्यासाठी लागणारं साहित्य खरेदी करणं, त्यांच्या जाण्यासाठी सुरक्षित मार्ग तयार करणं अशी सगळी तयारी या 11 जणांनी केली होती.

मुहम्मद अमजद खान, शाहीद गफूर, अतीक उर रेहमान, रिझ अहमद, मोहम्मद मुश्ताक, मोहम्मद नईम, अब्दुल शकूर, मोहम्मद शाबीर, मोहम्मद उस्मान, शकील अहमद, राहिम यार खान अशी त्या दहशतवाद्यांची नावे आहेत.

भारताने यासंदर्भात पाकिस्तानला अनेकदा पुरावे दिले होते. मात्र पाकिस्तान सातत्याने त्याचा इन्कार करत आला आहे. मात्र आता पाकिस्तानच्या मोठ्या तपास आणि गुप्तचर संस्थेनेच ही नावे जाहीर केल्याने भारताच्या दाव्याला बळ मिळालं आहे.

Published by: Ajay Kautikwar
First published: November 11, 2020, 6:32 PM IST

ताज्या बातम्या