बार्सिलोनात दहशतवादी हल्ला, 13 जणांचा मृत्यू 100 जण जखमी

बार्सिलोनात दहशतवादी हल्ला, 13 जणांचा मृत्यू 100 जण जखमी

आतापर्यंत दोन जणांना अटक केलीय तर ड्रायव्हर फरार आहे. ईसिसनं या हल्ल्याची जबबादारी घेतलीय.

  • Share this:

18 आॅगस्ट : स्पेनच्या बार्सिलोना शहरात दहशतवादी हल्ला झाला आहे. एक ट्रक गर्दीत घुसून अनेकांना चिरडलं गेलंय.  त्यात 13 जणांचा मृत्यू  आणि 100 जण जखमी झालेत. स्पेनचे पंतप्रधान मारियानो रखाॅय यांनी हा दहशतवादी हल्ला असल्याचं म्हटलंय.

आतापर्यंत दोन जणांना अटक केलीय  तर ड्रायव्हर फरार आहे. ईसिसनं या हल्ल्याची जबबादारी घेतलीय.

दक्षिण बार्सिलोनात तपास सुरू आहे. तर दुसऱ्या घटनेत 5 संशयित दहशतवाद्यांना ठार करण्यात आलंय.

परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज्य यांनी ट्विट करून आम्ही भारतीय दूतावासाच्या संपर्कात असल्याचं म्हटलंय. शिवाय तिथला चौकशीसाठीचा फोन नंबर 34-608769335ही ट्विट केलाय.

First published: August 18, 2017, 9:40 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading