फिलिपीन्स, 24 ऑगस्ट : फिलीपीन्सच्या दक्षिण भागात सोमवार संदिग्ध इस्लामिक दहशतवाद्यांनी केलेल्या बॉम्ब स्फोटात (Bomb Blast) 14 सैनिक आणि नागरिकांचा मृत्यू (Death) झाला आहे. सैन्य आणि पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, हल्लात तब्बल 75 सैनिक आणि पोलीस कर्मचारी, नागरिक जखमी झाले आहेत.
इस्लामिक स्टेट समूहाकडून संबद्ध दहशतवाद्यांनी यापूर्वीच हल्ल्याचा इशारा दिला होता. क्षेत्रिय सैन्य कमांडर लेफ्टनेंट जनरल कॉर्लेटो विनलुआन यांनी सांगितले की, सुलू प्रांतातील जोलो भागात झालेल्या बॉम्ब स्फोटात कमीत कमी 5 सैनिक आणि चार नागरिक मारले गेले.
हे वाचा-10 वर्षे जुनी इमारत पडूच कशी शकते? महाडमध्ये 200 जणांचा जीव धोक्यात
दुपारच्या वेळात सैन्याच्या दोन ट्रक आणि त्यानंतर एका कम्प्युटर दुकानाजवळ झालेल्या या हल्ल्यात मोटरसायकलमध्ये विस्फोटक लावून स्फोट घडवण्यात आला. विनलुआनने सांगितले की या गाडीत आयईडी लावण्यात आलं होतं. त्यानंतर जवळच तब्बल 1 तासाने दुसरा स्फोट झाला. हा स्फोट शक्यतो एक महिला आत्मघातकी हल्लेखोराने केला. यामध्ये आत्मघातकी हल्लेखोर आणि एका सैनिकाचा मृत्यू झाला आहे. काहीजण यात जखमी झाले आहे.
हे वाचा-महाड इमारत दुर्घटना Update: एकाचा मृत्यू तर JCBच्या मदतीने 8 जणांना वाचवलं
यानंतर येथील सुरक्षेसाठी जवानांना तैनात करण्यात आले आहे. जखमींना रुग्णवाहिकेने रुग्णालयात हलविण्यात आले आहे. बाजारात एक बॉम्बही मिळाला आहे. मात्र सुदैवाने या बॉम्बचा स्फोट झाला नाही. सुरक्षा आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी क्षेत्रात घेराबंदी केली आहे. या वर्षी झालेला हा सर्वात भीषण हल्ला आहे. ही घटना अशावेळी झाली जेव्हा फिलिपीन आणि पूर्ण दक्षिण-पूर्व आशिया कोविड - 19 च्या महासाथीशी सामना करीत आहे.
Published by:Meenal Gangurde
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.