कराची, 20 फेब्रुवारी: बलुचिस्तान प्रातांत (Balochistan province) पाकिस्तानी लष्कराच्या जवानांवर (Pakistan Army) आतंकवादी हल्ला (Terrorist attack) करण्यात आला आहे. बलुचिस्तानातील दोन वेगवेगळ्या ठिकाणी हा हल्ला करण्यात आला असून पाकिस्तान लष्कराची मोठी जीवितहानी (Massive loss of life) झाल्याची बातमी समोर आली आहे. दोन्ही ठिकाणी झालेल्या हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराला निशाणा बनवण्यात आलं आहे. यामध्ये पाकिस्तान लष्कराचे पाच जवान मृत्यूमुखी पडले असून दोन सैनिक गंभीर जखमी झाले आहेत.
फ्रंटियर कोरच्या सैनिकांना केलं लक्ष्य
बलुचिस्तान प्रांताची राजधानी क्वेटाचा बाहेरील परिसर आणि कोहलु जिल्ह्यातील दूरदराज परिसरात हा हल्ला करण्यात आला आहे. दोन्ही ठिकाणी पाकिस्तानच्या फ्रंटियर कोरच्या सैनिकांना लक्ष्य करण्यात आलं आहे. सुरक्षा अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बलुचिस्तानच्या बाहेरील परिसरात झालेल्या हल्ल्यात रिमोट नियंत्रित बॉम्बचा वार करण्यात आला होता. हा बॉम्ब मोटारसायकलमध्ये ठेवून फ्रंटियर कोरच्या जवानांना टार्गेट करण्यात आलं. या हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराच्या एका जवानाला प्राण गमवावा लागला तर अन्य दोघं गंभीर जखमी झाले आहेत.
सुरक्षा अधिकाऱ्यांनी सांगितलं की, दुसरा हल्ला कोहलु जिल्ह्यातील कहान परिसरात झाला. ज्यामध्ये आतंकवाद्यांनी फ्रंटियर कोरच्या तपास चौकीला लक्ष्य केलं होतं. ज्यामध्ये चार सैनिकांचा मृत्यू झाला. गुरुवारी रात्री उशीरापर्यंत ही अंधाधुन फायरिंग सुरू होती. आतंकवाद्याच्या या हल्ल्याला पाकिस्तानी जवानानी जशास तसे उत्तर दिलं.
हे ही वाचा-‘तू पुन्हा वाचणार नाहीस...’; दहशतवाद्यांच्या या धमकीला मलालाचं चोख उत्तर
खरं तर 'चायना-पाकिस्तान इकोनॉमिक कॉरिडॉर' हा चीनचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. याचा रस्ता बलुचिस्तान प्रांतातून पाकिस्तानला जोडण्यात येणार आहे. याच प्रकल्पाला विरोध म्हणून बलुचिस्तान प्रातांत अशांतता पसरली आहे. त्यामुळे या परिसरात आतंकी कारवाया वाढल्या आहेत. अलीकडेच बलुचिस्तान प्रांताच्या दूरदराज परिसरात आतंकवादी आणि फुटीरतावादी लोकांनी हल्ला केला होता. ज्यामध्ये पाकिस्तानी लष्कराचं बरंच नुकसान झालं होतं.