पेशावरमध्ये दहशतवादी हल्ला; आत्तापर्यंत 4 जखमी

सध्या पोलीस आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू असून कृषी वसतीगृहात 100 विद्यार्थी अडकले आहेत.

Chittatosh Khandekar | News18 Lokmat | Updated On: Dec 1, 2017 10:30 AM IST

पेशावरमध्ये दहशतवादी हल्ला; आत्तापर्यंत 4 जखमी

पेशावर, 01 डिसेंबर: पाकिस्तानातील  पेशावरमध्ये आज सकाळी दहशतवादी हल्ला आहे. दरम्यान सध्या पोलिसांची कारवाई चालू असून आतापर्यंत  चार इसम जखमी झाल्याची माहिती मिळते आहे.

पाकिस्तानच्या डॉन वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार आज सकाळी हा हल्ला झाला आहे. पेशावरच्या विद्यापीठ परिसरात कृषी संस्थानाजवळ तीन बुरखाधारी इसम आले. त्यांनी लगेच अंधाधुद गोळीबार सुरू केला. त्यानंतर लगेच  पोलिसांना पाचारण करण्यात आले असून सध्या विद्यापीठ परिसरात पोलिसांची कार्यवाही सुरू आहे.  ईद ए मिलादमुळे आज विद्यापीठाला सरकारी सुट्टी आहे. सूत्रांनुसार  लष्कराला ही बोलावण्यात आलं आहे. सध्या पोलीस आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू असून कृषी वसतीगृहात 100 विद्यार्थी अडकले आहेत.

काही वर्षांपूर्वी पेशावरच्या शाळेतही दहशतवादी हल्ला करण्यात आला होता.त्यातच काही दिवसांपूर्वी हाफिज सईदची निर्दोष मुक्तता करण्यात आली. या सगळ्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 1, 2017 10:26 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...