न्यूयॉर्कमध्ये दहशतवादी हल्ला;8 ठार

न्यूयॉर्कमध्ये दहशतवादी हल्ला;8 ठार

न्यूयॉर्कमध्ये झालेल्या या हल्ल्यात 8 जणांना ट्रकखाली चिरडण्यात आलं आहे.या हल्ल्यात 11 जण जखमी झालेत.

  • Share this:

न्यूयॉर्क,01 नोव्हॆंबर: अमेरिेकेत दहशतवादी हल्ल्यात 8 जणांचा मृत्यू झालाय. न्यूयॉर्कमध्ये झालेल्या या हल्ल्यात 8 जणांना ट्रकखाली चिरडण्यात आलं आहे.या हल्ल्यात 11 जण जखमी झालेत.

न्यूयॉर्कच्या मॅनहॅटन भागात वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या जवळ हा हल्ला झालाय. हा ट्रक एका स्कुल बसला धडकल्यानंतर, त्याच्या ड्रायव्हरला गोळी मारण्यात आली आणि त्याला ताब्यात घेण्यात आलंय. त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आणि ती आता संपलीय असं कळतंय. या हल्यात लहान मुलही जखमी झाली आहेत. सेफुलो सायपोव असं या दहशतवाद्याचं आहे. त्याचं वय आहे 29. तो मूळचा उजबेकिस्तानचा आहे, 2010 साली तो अमेरिकेत आला. त्याच्या ट्रकमध्ये एक चिठ्ठी सापडलीय. त्यात आयसिसच्या सांगण्यावरून त्यानं हे कृत्य केल्याचं म्हटलंय.जगात हल्ली हे असे हल्ले वारंवार होत आहेत. म्हणजे दहशतवाद्यांची टोळी वगैरे काही नसते. एकच माणूस निघतो आणि जमेल तेवढ्या निष्पाप लोकांचा बळी घेतो. आणि अशा व्यक्तींची गुन्हेगारी पार्श्वभूमीही नसते. त्यामुळे हल्ला करण्याआधी सुरक्षा यंत्रणेलाही काही सुगावा लागत नाही.

दरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला आहे.आयसिसला अमेरिकेत प्रवेश द्यायचा नाही  असा  स्पष्टपणे ट्रम्पने म्हटलं आहे. तसंच  मृतांच्या परिवारांना त्यांनी श्रद्धांजलीही वाहिली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 1, 2017 08:38 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading