S M L

फ्रान्सच्या कॅराकॅसोनेमध्ये अतिरेकी हल्ला;2 ठार

ट्रेबेस शहराजवळच्या कॅरोकॅसोनेमध्ये या काही हल्लेखोरांनी हल्ला केला. याचा आयसिसशी संबंध आहे की नाही हे स्पष्ट झालेलं नाही.

Chittatosh Khandekar | Updated On: Mar 23, 2018 05:28 PM IST

फ्रान्सच्या कॅराकॅसोनेमध्ये अतिरेकी हल्ला;2 ठार

23 मार्च: फ्रान्सच्या दक्षिण  भागातील ट्रेबेस शहराजवळील  कॅरोकॅसोने इथे  एका सुपर मार्केटमध्ये  बंदुकधारींनी हल्ला केला असून काही लोकांना ओलीस ठेवले आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यातील एका बंदुकधाऱ्याचा आयसिसशी  संबंध  आहे.

ट्रेबेस  शहराजवळच्या कॅरोकॅसोनेमध्ये या काही हल्लेखोरांनी हल्ला केला. याचा आयसिसशी संबंध आहे की नाही हे स्पष्ट  झालेलं नाही. दरम्यान हल्लेखोरांनी दोन  इसमांना ठार मारलं आहे. एक  हल्लेखोर आयसिसचे आणि सीरीयाचे नारे देत असल्याचीही माहिती मिळते  आहे. दरम्यान पोलीस आणि सुरक्षा दलांनी  आता या सुपर मार्केटला वेढा दिला आहे. आतापर्यंत हाती आलेल्या वृत्तानुसार 20 लोकांना सुपर मार्केट बाहेर काढण्यात पोलीसांना यश आलं आहे. हल्लेखोरांनी  पोलिसांवरही गोळीबार केला आहे.

फ्रान्सने खूप मोठ्या प्रमाणात आयसिसविरोधी कारवाईत भाग घेतला होता.तसंच काही वर्षांपूर्वी बुरखा बंदीचाही निर्णय फ्रान्समध्ये घेण्यात आला होता. या साऱ्यामुळेच अतिरेकी संघटनांच्या निशाण्यावर फ्रान्स आहे. दोन वर्षांपूर्वीही असाच हल्ला फ्रान्सच्या एका सुपर मार्केटमध्ये झाला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 23, 2018 05:24 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close