Elec-widget

26/11 सारख्या हल्ल्यानं कराची हादरलं, 3 पोलिसांसह 6 जणांचा मृत्यू

26/11 सारख्या हल्ल्यानं कराची हादरलं, 3 पोलिसांसह 6 जणांचा मृत्यू

या चकमकीत 3 पोलिसांसह 6 जणांचा मृत्यू झाला. तसंच पोलिसांकडून एका दहशतवाद्याच्या खात्मा करण्यात आला आहे.

  • Share this:

कराची, 23 नोव्हेंबर : पाकिस्तानातील कराची शहर दहशतवादी हल्ल्यानं हादरलं आहे. कराचीतील चीनच्या दुतावासाजवळ फायरिंग झाल्याचं वृत्त आहे. यामध्ये  3 पोलिसांसह 6 जणांचा मृत्यू झाला आहे.

डॉन न्यूजच्या वृत्तानुसार, कराचीतील चीनी दुतावासाच्या परिसरात ब्लास्टदेखील झाला आहे. दरम्यान, घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त पाठवण्यात आला आहे. अज्ञात हल्लेखोर आणि पोलिसांमध्ये अजूनही चकमक सुरू आहे.

या चकमकीत  3 पोलिसांसह 6 जणांचा मृत्यू झाला. तसंच पोलिसांकडून एका दहशतवाद्याच्या खात्मा करण्यात आला आहे, अशी माहिती तेथील डीआयजी जावेद आलम यांनी दिली आहे.

सिंध प्रांताचे गव्हर्नर इमरान इस्माईल यांनी आयजी पोलिसांकडून घटनेची माहिती मागवली आहे. तसंच गव्हर्नर यांच्याकडून सिंध प्रांताचे मुख्यमंत्री मुराद अली शाह यांच्याशी देखील संपर्क करण्यात आला आहे.


Loading...

(बातमी अपडेट होत आहे)


 

VIDEO : 'वुई वाँट मुंढे'च्या घोषणेत मुंढेंची पालिकेत एंट्री


 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 23, 2018 11:31 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...