S M L

शोधा राज्य/ मतदार संघ

शांतता, 'सामना' सुरू आहे...!

Samruddha Bhambure | Updated On: Apr 20, 2017 10:43 AM IST

शांतता, 'सामना' सुरू आहे...!

20 एप्रिल : आपल्याकडे क्रिकेट किंवा इतर कुठल्या खेळाचा सामना अनेक वेळेस मध्येच थांबवावा लागतो. त्याला कारण असतं ते म्हणजे कधी खेळातच अडथळे आणणारे कुत्रे, तर कधी कधी किडे. पण अमेरिकेतल्या फ्लोरीडात टेनिसचा सामना ज्या कारणामुळे थांबवावा लागला ते ऐकलंत तर तुम्हाला वाटेल..बाप रे आज काल काय ऐकावं लागेल याचा नेम नाही.

अमेरिकन टेनिसपटू फ्रान्सेस तियेफो आणि मिशेल क्रुगर यांच्यात टेनिसचा सामना सुरु होता. एटीपी टूरचा सामना असल्यामुळे तो अटीतटीचाच असणार. दोन्ही खेळाडू जीव लावून खेळत होते. तोच अतिशय शांत अशा टेनिस कोर्टवर लव्ह मेकिंगचा आवाज यायला सुरुवात झाली. कमेंटटरच्याही ते लक्षात आलं. आवाज एवढा होता की काही काळासाठी दोन्ही खेळाडू थांबले. कुणी प्रेक्षकांमध्ये पॉर्न व्हिडीओ पहातंय का याची चाचपणी झाली. पण सगळे जण टेनिसच बघत होते. पण आवाज काही थांबेना. प्रेक्षकांमध्ये हास्याचे फवारे उडायला लागले. लहान लेकरांना घेऊन आलेल्या आईंनी मुलांना दुर्लक्ष करायला सांगितलं. सगळीच स्थिती अवघड होती. पण लव्ह मेकिंगचा आवाज काही थांबत नव्हता. शेवटी आवाज बाजुच्या एका अपार्टमेंटमधून येत असल्याचं कमेंटटरनं सांगितलं. आणि सामना पुढं चालू राहीला..टेनिस बघायला गेलेल्या प्रेक्षकांचं असंही मनोरंजन झालं. पण त्याचा शेवट कमेंटेटरनं मिश्लिकपणे केला. कुणाची तरी गुडनाईट रंगलीय हे सांगायला तो विसरला नाही... सामना अर्थातच सुरु राहीला.

 

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 20, 2017 10:43 AM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close