भारताच्या या मित्र राष्ट्राने केला एअर स्ट्राईक, एकाच वेळी 100 ठिकाणी केला हल्ला

भारताच्या या मित्र राष्ट्राने केला एअर स्ट्राईक, एकाच वेळी 100 ठिकाणी केला हल्ला

भारताचा मित्र असलेल्या इस्त्रायलने गाझा परिसरातील 100 ठिकाणी एअर स्टाईक केला आहे.

  • Share this:

जेरुसलेम, 15 मार्च: भारताचा मित्र असलेल्या इस्त्रायलने गाझा परिसरातील 100 ठिकाणी एअर स्ट्राईक केला आहे. इस्त्रायलची राजधानी तेल अवीव येथे झालेल्या 4 रॉकेट हल्ल्यानंतर ही कारवाई केली आहे. AFPने दिलेल्या वृत्तानुसार इस्त्रायलच्या विमानांनी हमासच्या सुरक्षा चौक्यांवर बॉम्बने हल्ला केला. या कारवाईला इस्त्रायलच्या लष्कराने देखील दुजोरा दिला आहे.

इस्त्रायल लष्कराने दिलेल्या वृत्तानुसार एअर स्ट्राईक गाझा परिसरातील दक्षिणेकडील खान युनिस परिसरात करण्यात आला. ही परिसर मुख्य शहरापासून 25 किलोमीटर लांब आहे. इस्त्रायल लष्कराने केलेल्या दाव्यानुसार हमासच्या 100 केंद्रांवर हल्ले बॉम्ब टाकण्यात आले आहेत. हमास ही एक पॅलेस्टाईनी सुन्नी मुस्लिम संघटना आहे. अनेक देशांनी या दहशतवादी संघटना म्हणून जाहीर केले आहे. हमासकडून इस्त्रायलमध्ये दहशतवादी कारवाया केल्या जातात.
2014नंतर प्रथमच केला हल्ला

इस्त्रायलची राजधानी तेल अवीव येथे 2014नंतर प्रथमच रॉकेटने हल्ला केला होता. पण इस्त्रायली रडाराने त्या रॉकेटला भेदले होते. येत्या 9 एप्रिल रोजी इस्त्रायलमध्ये निवडणुका होणार आहेत. त्याआधी तेथील लष्कराने ही कारवाई केली. भारताने 26 फेब्रुवारी रोजी पाकिस्तानच्या बालाकोटमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या तळावर एअर स्ट्राईक केला होता. या हल्ल्यात 200हून अधिक दहशतवादी ठार झाले होते. जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या आत्मघाती हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले होते. त्यानंतर 13व्या दिवशी भारताने एअर स्ट्राईक करत पाकला दणका दिला होता.


VIDEO : एका बुक्कीत दात पाडेन, काँग्रेस आमदाराची पोलीस अधिकाऱ्याला दमदाटी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 15, 2019 07:39 PM IST

ताज्या बातम्या