'टेडी बिअर मम्मा'ने मोडला विक्रम, कोरोनाच्या काळात गोळा केले चक्क 20 हजार Teddy

'टेडी बिअर मम्मा'ने मोडला विक्रम, कोरोनाच्या काळात गोळा केले चक्क 20 हजार Teddy

'लहानपणी मला एक टेडी बिअर हवा होता जेणेकरुन मी त्याला मिठी मारू शकेल आणि त्याच्याकडून मला थोडे प्रेम मिळेल.'

  • Share this:

बुडापेस्ट (हंगेरी), 19 जानेवारी: गोंडस टेडी बिअर कोणाला आवडत नाही. टेडी बिअर पाहून सगळ्यांनाच आनंद होतो. लहानपणी अनेकांजवळ खेळण्यातला टेडी बिअर आपला खूप चांगला मित्र देखील झालेला असायचा. पण आपल्याला जवळपास 20 हजारांपेक्षा जास्त टेडी बिअरने मिठी मारल्याची कल्पना करा? हे फक्त स्वप्नातच घडलं असावं असं वाटतं ना. पण हे खरं आहे. हंगेरीच्या (Hungary) वलेरिया श्मिटकडे 20 हजारांपेक्षा जास्त टेडी बिअर आहेत. कोरोना महामारीच्या काळात वलेरिया यांनी 20 हजार टेडी बिअर गोळा करत विक्रम केला आहे.

62 वर्षीय वलेरिया श्मिट या 'टेडी बिअर मम्मा' (Teddy Bear Mama) म्हणून ओळखल्या जातात. गेल्या 40 वर्षांपासून त्या स्टफ्ड टॉय गोळा करत आहेत. सध्या 14 हजार स्टफ टॉयसह टेडी बिअर गोळा करत त्यांनी हंगेरियन विक्रम मोडला आहे. 20367 पेक्षा जास्त टेडी बिअरचा मोठा संग्रह (Largest Teddy Bear Collection) केल्यामुळे 2019 मध्ये त्यांच्या नावाची नोंद गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये (Guinness Book of Records) करण्यात आली.

रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, वलेरिया श्मिट (Valeria Schmidt) नर्सरी, शाळा आणि गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी आपल्याकडे संग्रहित असलेल्या टेडी बिअरचे प्रदर्शन भरवतात. या प्रदर्शनात मोठ्या प्रमाणात लहान मुलं सहभागी होऊन टेडी बिअरशी खेळतात. उत्तर-पूर्व हंगेरीतील एका स्थानिक नागरिकाने सांगितले की, 'श्मिट सध्या 20 हजारांपेक्षा जास्त टेडी बिअरच्या संग्रहालयाची देखभाल करत आहेत. कारण कोरोना माहामारीच्या काळात त्यांना टेडी बिअरच्या वितरणास आणि प्रदर्शनाचे आयोजन करण्यास बंदी घातली आहे. '

हे ही वाचा-बांगलादेशातील मादी गेंड्यालाही सहन होत नाही आहे जोडीदाराचा विरह, सोडलं अन्नपाणी!

रॉयटर्सने प्रसिद्ध केलेल्या एका व्हिडीओमध्ये श्मिटने आपल्याकडे मोठ्या प्रमाणात संग्रहित असलेल्या टेडी बिअर्सला दाखवत वर्ल्ड रेकॉर्ड कशापद्धतीने तोडले हे सांगितलं. 'लोकांनी मोठ्या प्रमाणात मला टेडी बिअर पाठवले आणि ते मी विकत घेत गेले.', असं त्या म्हणाल्या. तसंच, आपल्या या अनोख्या आवडीबद्दल आणि प्रवासाबद्दल सांगताना श्मिट म्हणाल्या की, 'मी आर्थिकदृष्ट्या अत्यंत गरीब कुटुंबात वाढले. माझ्याकडे एकही खेळणे नव्हते. कारण माझ्या कुटुंबाकडे कपडे खरेदी करण्याठी देखील पैसे नव्हते.'

'चार वर्षांची असताना माझ्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला. माझे बालपण खूप गरिबीत गेले. त्यामुळे मला एक टेडी बिअर हवा होता जेणेकरुन मी त्याला मिठी मारु शकेल आणि त्याच्याकडून मला थोडे प्रेम मिळेल.', असे श्मिट यांनी सांगितले. संकटाच्या काळात प्रेम आणि सांत्वन मिळावे अशी श्मिड यांची इच्छा होती ती टेडी बिअरकडून मिळावी असे त्यांना वाटत होते. पण 20 व्या वर्षी त्यांनी पहिला टेडी बिअर खरेदी केला. त्यानंतर त्यांनी कधीच टेडी बिअर खरेदी करणे थांबवले नाही. आज त्यांच्याकडे टेडी बिअरचा संग्रह वाढतच चालला आहे. टेडी बिअरच्या प्रदर्शना मार्फत इतर मुलांना प्रेम मिळावे अशी इच्छा त्यांनी व्यक्त केलीये.

Published by: Meenal Gangurde
First published: January 19, 2021, 12:49 PM IST

ताज्या बातम्या