कैरो, 13 जानेवारी: एका महिला शिक्षिकेचा (Female Teacher) बेली डान्स (Belly Dance) करतानाचा व्हिडिओ व्हायरल (Viral Video) झाल्यानंतर तिला आपली नोकरी गमावावी (Lost her job) लागल्याची घटना इजिप्तमध्ये (Egypt) घडली आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तिच्या पतीनेदेखील तिला घटस्फोट दिला. हा प्रकार अन्यायकारक असल्याची भूमिका घेत महिला संघटना जेव्हा रस्त्यावर उतरल्या, तेव्हा प्रशासनाला माघार घेत तिची नोकरी तिला परत द्यावी लागली. या सगळ्या प्रकारात शिक्षिकेला मोठा मनस्ताप सहन करावा लागला. देशभर रंगला वादएका शिक्षिकेनं बेली डान्स करणं योग्य की अयोग्य यावरून देशभर जोरदार वाद रंगला. इस्लामी संस्कृतीनुसार शिक्षिणाचं काम करणाऱ्या महिलेनं बेली डान्स करणं योग्य नसल्याचं मत अनेक सनातनी मंडळींनी व्यक्त केलं. तर बेली डान्स हा एक कलाप्रकार असून कुठल्याही व्यवसायातील व्यक्ती आपल्याला आवडणाऱ्या कलेची जोपासना करू शकते, असं मत इजिप्तमधील पुरोगामी मंडळी व्यक्त करत आहेत. बोटीवर केला डान्सअया युसूफ नावाची शिक्षिका तिच्या मैत्रिणीसोबत नाईल नदीकिनारी असणाऱ्या एका बोटीत जेवणासाठी गेली होती. इजिप्तची राजधानी कैरोमध्ये नाईल नदीच्या पात्रात अशा बोटी उभ्या असतात आणि त्यावर जेवण्याची आणि संगीताच्या मैफिलींची सोय करण्यात आलेली असते. या बोटीवर एन्जॉय करत असताना समोर सुरू असलेला बेली डान्स पाहून अयालाही डान्स करण्याची इच्छा झाली. त्यामुळे तिनेही बेली डान्सच्या ठेक्यावर ताल धरला आणि मनसोक्त नृत्य केलं. तिच्या मैत्रिणीने तिचा हा डान्स मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला. दहा मिनिटांनी बदललं आयुष्यबोटीवर घालवलेली दहा मिनिटं आपलं आयुष्य उद्धवस्त करतील, याची अजिबातच कल्पना नव्हती, अशी प्रतिक्रिया अया युसूफ यांनी दिली आहे. बेली डान्स हा खरं तर फेरोंच्या काळापासून चालत आलेली नृत्यपरंपरा आहे. मात्र आजही हा डान्स करणं कमीपणाचं लक्षण मानलं जातं. प्रतिष्ठित मानली जाणारी अनेक मंडळी या डान्सचा आस्वाद घेण्यासाठी बोटींवर गर्दी करतात, मात्र एखाद्या प्रतिष्ठित व्यवसायातील महिलेनं तसा डान्स करणं हे कमीपणाचं लक्षण मानलं जातं.
हे वाचा -
आंदोलनानंतर नोकरी मिळालीया मुद्द्यावरून अया युसूफ यांच्या पतीनं त्यांना घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला. इजिप्तमधील महिला संघटनांनी यावरून आंदोलन केल्यानंतर अखेर सरकारनं अया यांना नोकरी परत देण्याचा निर्णय घेतला आणि दुसऱ्याच शाळेत त्यांना शिक्षिकेची नोकरी देण्यात आली. आपण काही प्रेक्षकांसमोर किंवा विद्यार्थ्यांसमोर डान्स परफॉर्मन्स केला नव्हता, असं अया यांचं म्हणणं आहे. शिवाय आपल्या परवानगीशिवाय आपला व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करणाऱ्या व्यक्तीलाही शिक्षा व्हावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.
Published by:desk news
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.