• Home
 • »
 • News
 • »
 • videsh
 • »
 • अरे बापरे! 41 वर्षांच्या शिक्षिकेचे 15 वर्षांच्या विद्यार्थ्याशी संंबंध, Pregnant राहिल्यामुळे झाला बोभाटा

अरे बापरे! 41 वर्षांच्या शिक्षिकेचे 15 वर्षांच्या विद्यार्थ्याशी संंबंध, Pregnant राहिल्यामुळे झाला बोभाटा

एका शिक्षिकेनं अल्पवयीन विद्यार्थ्याशी लैंगिक संबंध (Teacher gets pregnant with student) ठेवल्याचं उघड झाल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

 • Share this:
  फ्लोरिडा, 11 ऑक्टोबर : एका शिक्षिकेनं अल्पवयीन विद्यार्थ्याशी लैंगिक संबंध (Teacher gets pregnant with student) ठेवल्याचं उघड झाल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. खरं तर शिक्षक आणि विद्यार्थी या नात्याकडे एका पवित्र नातं (Relation between teacher and student) म्हणून पाहिलं जातं. विद्यार्थ्याला घडवण्याचं काम शिक्षक करत असतात. त्यामुळे पालक विश्वासानं आपल्या पाल्याला शिक्षकांकडे पाठवत असतात. मात्र या विश्वासाला एका शिक्षिकेनं तडा घालवल्याची घटना उघडकीला आली आहे. अशी घडली घटना अमेरिकेतील फ्लोरिडामध्ये राहणाऱ्या हैरी क्लैवी ( Heiry Clavi) या 41 वर्षांच्या शिक्षिकेनं तिच्या 15 वर्षांच्या विद्यार्थ्यासोबत लैंगिक संबंध प्रस्थापित केल्याची घटना नुकतीच उघडकीला आली आहे. याहून धक्कादायक म्हणजे या विद्यार्थ्यांपासून शिक्षिका प्रेगनंट राहिली. तिच्या प्रेगनन्सीची बातमी जेव्हा सर्वांसमोर आली, तेव्हा विद्यार्थ्यासोबतच्या शिक्षिकेच्या लैंगिक संबंधांचा खुलासा झाला. ही शिक्षिका सध्या 6 महिन्यांची गर्भवती असून प्रकार उघडकीला आल्यानंतर पोलिसांनी तिला अटक केली आहे. विद्यार्थ्याने घेतली शिक्षिकेची बाजू या शिक्षिकेवर अल्पवयीन मुलासोबत संबंध ठेवल्याचा आऱोप तर लावण्यात आला आहेच, शिवाय शाळेत बंदूक घेऊन येण्याचा आरोपही ठेवण्यात आला आहे. या शिक्षिकेवर बाल लैंगिक शोषणाचा आरोप असला, तरी विद्यार्थी मात्र शिक्षिकेच्या बाजूने उभा आहे. आपल्या शिक्षिकेनं आपल्यावर बलात्कार केला नसल्याचा दावा त्यानं केला आहे. आपली शिक्षिकेविरुद्ध कुठलीही तक्रार नसल्याचं त्यानं म्हटलं आहे. मात्र फ्लोरिडातील नियमानुसार अल्पवयीन मुलासोबत किंवा मुलीसोबत लैंगिक संबंध ठेवणं, हाच गुन्हा आहे. अल्पवयीन मुलांसोबत त्यांच्या सहमतीने ठेवलेले संंबध हादेखील कायद्याने गुन्हा आहे. त्यामुळे विद्यार्थ्याने शिक्षिकेची बाजू घेतल्याचा कुठलाही फायदा त्यांना होणार नसल्याचा दावा सरकारी वकिलांनी केला आहे. हे वाचा - BUNJEE JUMPING करताना तुटली दोरी, 80 फुटांवरून पडून झाला मृत्यू विद्यार्थ्याच्या मोबाईलमध्ये अश्लील व्हिडिओ पोलिसांनी केलेल्या तपासात विद्यार्थ्याच्या मोबाईलमध्ये त्याचे शिक्षिकेसोबतचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ असल्याचंही आढळून आलं आहे. या शिक्षिकेवर कारवाई करण्यात आली असून यापुढे कुठल्याही सरकारी शाळेत ती शिक्षिकेचं काम करू शकणार नाही. त्याचप्रमाणे प्रेगनंट असल्याचं कारण देत जामीन मिळवण्यासाठी 14 लाख रुपये भरावे लागणार आहेत.
  Published by:desk news
  First published: