मराठी बातम्या /बातम्या /विदेश /''ज्यांची छाती सपाट आहे, ते पुरुष आहेत'', टांझानियाच्या महिला राष्ट्राध्यक्षांचं महिला फुटबॉलपटूवर विवादास्पद वक्तव्य

''ज्यांची छाती सपाट आहे, ते पुरुष आहेत'', टांझानियाच्या महिला राष्ट्राध्यक्षांचं महिला फुटबॉलपटूवर विवादास्पद वक्तव्य

टांझानियाच्या राष्ट्राध्यक्ष (Tanzania President) समिया सुलुहु हसन (Samia Suluh Hasan) यांनी महिला फुटबॉलपटूंच्या ‘सपाट छाती’बाबत (Flat Chest) विवादास्पद वक्तव्य केलं आहे.

टांझानियाच्या राष्ट्राध्यक्ष (Tanzania President) समिया सुलुहु हसन (Samia Suluh Hasan) यांनी महिला फुटबॉलपटूंच्या ‘सपाट छाती’बाबत (Flat Chest) विवादास्पद वक्तव्य केलं आहे.

टांझानियाच्या राष्ट्राध्यक्ष (Tanzania President) समिया सुलुहु हसन (Samia Suluh Hasan) यांनी महिला फुटबॉलपटूंच्या ‘सपाट छाती’बाबत (Flat Chest) विवादास्पद वक्तव्य केलं आहे.

टांझानिया, 24 ऑगस्ट:  प्रत्येक क्षेत्रात महिलांनी पुरुषांच्या बरोबरीनं आपलं कर्तृत्व सिद्ध केलं आहे. कोणत्याही क्षेत्रात त्या महिला आहेत म्हणून कोणतीही सवलत न घेता पुरुषाइतकीच अव्वल कामगिरी महिलांनी करून दाखवली आहे. माणूस म्हणून त्यांनाही पुरूषांइतकाच समान हक्क मिळावा यासाठीच्या संघर्षाला आता यश मिळत आहे. प्रत्येक क्षेत्रात महिलांसाठी समान संधीची दारे खुली होत आहेत. खेळ असो, सैन्यदल असो शारीरिक फरकाच्या बळावर महिलांसाठी कोणतीही संधी आता नाकारली जाऊ शकत नाही. अशा आधुनिक काळात महिलांवर शारीरिक वैशिष्ट्यांवरून टिप्पणी केली जावी तीही एखाद्या देशाच्या महिला राष्ट्राध्यक्षांनी हे अत्यंत धक्कादायक आणि दुर्दैवी आहे. विऑन न्यूजनं याबाबतचं वृत्त दिलं आहे.

टांझानियाच्या राष्ट्राध्यक्ष (Tanzania President) समिया सुलुहु हसन (Samia Suluh Hasan) यांनी महिला फुटबॉलपटूंच्या ‘सपाट छाती’बाबत (Flat Chest) विवादास्पद वक्तव्य करून आपलं वैचारिक दारिद्र्य सिद्ध केलं आहे. त्यांच्या या टिप्पणीनंतर जगभरातून त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे. इथिओपियाच्या राष्ट्राध्यक्ष सहले-वर्क झ्युडे यांच्यासह हसन या आफ्रिकेतील एकमेव महिला अध्यक्ष आहेत. त्यांनी असे वक्तव्य केल्यानं सखेद आश्चर्य व्यक्त होत असून, त्यांचा निषेध केला जात आहे.

तालिबानच पाकिस्तानला काश्मीर जिंकून देईल, इम्रान खान यांच्या पक्षाचे नेते दाखवतायत गुर्मी

रविवारी, 22 ऑगस्ट रोजी एका प्रादेशिक फुटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत (Regional Football Championship) राष्ट्रीय पुरुष संघाच्या (National Men Team) विजय समारंभात बोलताना समिया सुलुहु हसन म्हणाल्या की, ‘ज्यांची छाती सपाट आहे, ते पुरुष आहेत, त्या महिला नाहीत, असं तुम्हाला वाटेल. पण तुम्ही त्यांचे चेहरे बघितले तर आश्चर्य वाटेल. कारण तुम्हाला लग्न करायचे असेल आणि आकर्षक स्त्री हवी असेल पण त्या तशा नसतील. महिला फुटबॉलपटूंमधून ‘ते’ गुण नाहीसे झाले आहेत.’

‘जेव्हा त्या देशासाठी ट्रॉफी आणतात तेव्हा एक राष्ट्र म्हणून आम्हाला अभिमान वाटतो; परंतु भविष्यात त्यांचे आयुष्य पहाल, तर खेळून खेळून पाय थकले असतील आणि त्यांच्याकडे खेळायला ताकद नसेल. त्यांचे आयुष्य काय असेल?’ असा सवालही त्यांनी उपस्थित केला. ‘त्यांच्यासाठी लग्न होणं हे स्वप्नासारखं आहे. कारण तुमच्यापैकी कोणीही त्यांना तुमची पत्नी म्हणून घरी घेऊन गेलात तरी तुमची आई विचारेल की ती स्त्री आहे की सहकारी पुरुष.’ असंही त्या म्हणाल्या. हसन यांच्या महिला फुटबॉलपटूंबद्दलच्या (Female Football Players) वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आणि त्यांच्याविरुद्ध टीकेची एकच झोड उठली.

‘महिला फुटबॉलपटूंवर अध्यक्ष सामिया यांनी केलेली टिप्पणी सर्व महिलांचा अपमान आहे,’ अशी टीका विरोधी चाडेमा पक्षाच्या महिला शाखेच्या प्रमुख आणि माजी खासदार कॅथरीन रुगे यांनी म्हटलं आहे. ‘चेंज टांझानिया’ या सामाजिक संस्थेच्या संस्थापक मारिया सरुंगी यांनीही रूगे यांच्या मताला दुजोरा दिला आहे.

काबूल एअरपोर्टवरुन युक्रेनचं विमान हायजॅक

‘महिला अध्यक्षपदाचा जयघोष करणारे सर्वजण सामिया यांच्या महिला फुटबॉल खेळाडूंना ‘सपाट छाती’ असल्याच्या वक्तव्याबद्दल बदनाम करत आहेत. तुम्हाला अभिमान वाटला पाहिजे @AWLNetwork.’ असं ट्विट सरुंगी यांनी केलं आहे.

‘या महिलेला टांझानियाला अफगाणिस्तानमध्ये बदलायचे आहे. आमच्या महिलांचे अधिकार कोठे आहेत. ममा आमच्या आफ्रिकन महिलांना त्या ज्यात चांगल्या आहेत त्यात उत्कृष्ट काम करण्यास प्रोत्साहित करतात,’ अशी प्रतिक्रिया एका युझरने दिली आहे, तर ‘हे म्हणजे लग्नाशिवाय आयुष्य निरर्थक आहे असे म्हणण्यासारखे आहे, असं एका युझरनं म्हटलं आहे.

अफगाणिस्तानात जीन्सवर बंदी? हा इस्लामचा अपमान असल्याचं सांगत तरुणांना तालिबानकडून मारहाण

 त्यांनी टांझानियातील सर्व महिला फुटबॉल खेळाडूंची माफी मागितली पाहिजे, अशी मागणी करत एका युझरनं ‘अध्यक्ष समिया यांचं वक्तव्य अत्यंत दु:खद असल्याचं म्हटलं आहे. ‘आकार आणि सपाट छातीचा प्रश्न कुठे येतो? आनुवंशिक अवस्था ही मौलानाची बाब आहे. तो सांगेल तो खेळाडूंची कशी मदत करू शकतो ते. खेळाडू आणि टांझानियातील स्पोर्ट्सची स्थिती सुधारण्यासाठी तो काय करू शकतो, हे देखील तो सांगेल.’ असं या युझरनं म्हटलं आहे.

या टीकास्त्रानंतर सामिया हसन काय भूमिका मांडतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

First published:
top videos

    Tags: President