काबुल, 5 सप्टेंबर : अफगाणिस्तानमध्ये (
Afghanistan) तालिबानची (
Taliban) सत्ता येऊन आता जवळपास 3 आठवडे (
3 weeks) उलटून गेले आहेत. मात्र अद्यापही तालिबानला सरकार स्थापन करण्यात यश आलेलं नाही. अंतर्गत सत्तास्पर्धा (
Internal power sharing) आणि आंतरराष्ट्रीय दबाव (
International pressure) या कारणांमुळे तालिबानला (
Taliban) सत्तास्थापनेत उशीर होत असल्याची माहिती आहे. 15 ऑगस्टला काबुलवर ताबा मिळवल्यानंतर काही दिवसांतच तालिबान नव्या सरकारची स्थापना करेल, असं सांगण्यात येत होतं. मात्र प्रत्यक्षात अद्यापही तालिबानला सत्ता स्थापन करण्यात यश आलेलं नाही.
आंतरराष्ट्रीय प्रतिमा
तालिबानला एक असं सरकार स्थापन करायचं आहे, ज्याला जगाची मान्यता असेल. आंतरराष्ट्रीय समुदायाने मान्यता देणं आणि बंद पडलेले आर्थिक स्त्रोत सुरू होणं, ही तालिबानची प्रमुख गरज आहे. एकीकडे शरिया कायद्यातील सर्व नियमांची अंमलबजावणी करणं आणि दुसरीकडं आंतरराष्ट्रीय मान्यता मिळेल, अशा प्रकारे सरकारची रचना ठेवणं, हे दुहेरी आव्हान तालिबानपुढे आहे. त्यामुळे सरकार स्थापनेला उशीर होत असल्याचं सांगण्यात येत आहे.
अंतर्गत सत्तास्पर्धा
सरकारमध्ये कुणाला किती प्रतिनिधीत्व मिळणार यावरून हक्कानी नेटवर्क आणि तालिबान यांच्यात रस्सीखेच सुरू असल्याची माहिती आहे. दोन्ही संघटनांनी स्वतःला सत्तेत अधिक वाटा मिळावा, अशी मागणी केली आहे. त्यामुळे याबाबत या दोन्ही संघटनांमध्ये एकमत होऊ शकलेलं नाही. तालिबानचे सह संस्थापक अब्दुल गनी बरादर आणि हक्कानी नेटवर्कच्या नेत्यांमध्ये जोरदार संघर्ष आणि गोळीबार झाल्याचीही माहिती आहे. मात्र अद्याप त्याची खातरजमा झालेली नाही.
हे वाचा -
'लोकांसाठी Nude होणं मला आवडतं'; PPT द्वारे मुलीनं केला Secret जॉबचा खुलासा
पंजशीरबाबत संभ्रम
पंजशीर अद्याप पूर्णतः ताब्यात आलं नसल्यामुळे त्याबाबत नेमकं काय करायचं, याविषय़ी तालिबानमध्येच संभ्रम आहे. पंजशीरसोबत चर्चा करून तोडगा काढावा, या मताचे काही तालिबानी आहेत, तर हल्ला करून तो भूभाग जिंकून घेण्यासाठी काहीजण आक्रमक आहेत.
या तीन मुख्य कारणांमुळे अफगाणिस्तानात अद्याप सरकारची घोषणा होऊ शकलेली नाही. पुढील काही दिवसांतच आम्ही सरकारची अधिकृत घोषणा करू, असं तालिबानच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.