मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

आज नव्या तालिबानी सरकारची होणार स्थापना; कोणाला मिळणार मंत्रीपद?, कोण करणार सरकारचं नेतृत्त्व?, वाचा सविस्तर

आज नव्या तालिबानी सरकारची होणार स्थापना; कोणाला मिळणार मंत्रीपद?, कोण करणार सरकारचं नेतृत्त्व?, वाचा सविस्तर

Talibani government: आज अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) तालिबानच्या (Taliban) नव्या सरकारची घोषणा होणार आहे.

Talibani government: आज अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) तालिबानच्या (Taliban) नव्या सरकारची घोषणा होणार आहे.

Talibani government: आज अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) तालिबानच्या (Taliban) नव्या सरकारची घोषणा होणार आहे.

  • Published by:  Pooja Vichare

अफगाणिस्तान, 04 सप्टेंबर: आज अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) तालिबानच्या (Taliban) नव्या सरकारची घोषणा होणार आहे. मुल्ला बरादर यांच्या नेतृत्वाखालील नव्या सरकारमध्ये कोणाला स्थान मिळणार आहे हे स्पष्ट होऊ शकलं नसलं तरी तालिबानच्या नव्या सरकारमध्ये (Taliban government) काही नवीन चेहरे दिसण्याची शक्यता आहे.

तालिबानचा संस्थापक मुल्ला उमरचा मुलगा मुल्ला मोहम्मद याकूब, शेर मोहम्मद अब्बास स्टेनकजई देखील नव्या सरकारमध्ये महत्त्वाची पदावर असणार असल्याचं सांगण्यात येत आहे. नव्या तालिबान सरकारच्या स्थापनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शेर अब्बास स्टेनकजईला परराष्ट्र मंत्री केलं जाण्याची शक्यता आहे.

हमीद करजईला मिळू शकतं मंत्रीपद

बरादर सरकारमधील इतर नेत्यांची भूमिका काय असेल यावर सतत मंथन सुरू असल्याचं समजतंय. तसंच माजी राष्ट्राध्यक्ष हामिद करजई आणि माजी मुख्य कार्यकारी डॉ. अब्दुल्ला यासारख्या नेत्यांना सरकारमध्ये जागा मिळते की नाही हे पाहावं लागेल. या दोन्ही नावांवरील चित्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

या महिन्याच्या अखेरीस PM नरेंद्र मोदी अमेरिका दौऱ्यावर?

या विभागांसंदर्भात अद्याप चर्चा सुरु

तालिबान संस्थापक मुल्ला उमरचा मुलगा मुल्ला याकूब आणि सिराजुद्दीन हक्कानी यांच्यात सैन्य आणि शस्त्रास्त्रांच्या नियंत्रणावरून मतभेद झाल्याचे वृत्त आहे. गुप्तचर अधिकाऱ्यांच्या मते, न्याय, धार्मिक घडामोडी आणि अंतर्गत सुरक्षा विभागांबाबत दोघांमध्ये मतभेद आहेत.

बांगलादेशचा न्यूझीलंडवर पुन्हा विजय, ऑस्ट्रेलियाला बसला मोठा फटका 

एक दिवस उशीरानं सरकार स्थापन

शुक्रवारी तालिबाननं नवीन अफगाणिस्तान सरकारच्या स्थापनेची तारीख एका दिवसासाठी पुढे ढकलली होती. नवीन अफगाणिस्तान सरकारची स्थापना जी शुक्रवारी केली जाणार होती, ती आता एक दिवस उशिरा होणार आहे, असे दहशतवादी गटाचे प्रवक्ते झबीउल्ला मुजाहिद यांनी शुक्रवारी सांगितलं. मुजाहिद म्हणाले की, नवीन सरकारच्या स्थापनेची घोषणा आता शनिवारी (आज) केली जाणार आहे.

First published:

Tags: Afghanistan, Taliban