इस्लामाबाद, 24 ऑगस्ट : तालिबान (Taliban) पाकिस्तानसाठी (Pakistan) आपली ताकद (strength) वापरून काश्मीर (Kashmir) पाकिस्तानला मिळवून देईल, असा दावा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांच्या पक्षातील एका नेत्याने केला आहे. इम्रान खान यांचा पक्ष तहरीक-ए-इन्साफ आणि तालिबानी यांच्यात दृढ संबंध असल्याचं यापूर्वीही जाहीर झालं आहे. आता पाकिस्तानमधील इम्रान खान यांच्या पक्षाच्या नेत्या नीलम इरशाद (Neelam Irshad) यांनी तालिबान्यांच्या मदतीनं लवकरच काश्मीर जिंकून घेण्याचा दावा केला आहे.
खळबळजनक दावा
तहरीक-ए-इन्साफ पक्षाच्या नेत्या नीलम इरशाद यांनी एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत तालिबानच्या मदतीनं काश्मीर जिंकण्याचा दावा केला आहे. अफगाणिस्तानमध्ये आता तालिबानचं सरकार आलं असून लवकरच तालिबानच्या मदतीनं पाकिस्तान भारताकडून काश्मीर जिंकून घेण्यात यशस्वी ठरेल, असा खळबळजनक दावा त्यांनी केला आहे.
तालिबान का करेल मदत?
पाकिस्तानला काश्मीर जिंकण्यासाठी तालिबान का मदत करेल, असा प्रश्न नीलम इरशाद यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी भारतानं आपल्या भूभागाचे तुकडे केल्याचं सांगितलं. आता आम्ही पुन्हा एकत्र येऊन आमचा हक्क मिळवू, असं त्यांनी म्हटलं आहे. सरकारकडे सध्या पॉवर असून तालिबान आम्हाला साथ देईल आणि आम्ही आमचं स्वप्न पूर्ण करू, असा दावा त्यांनी केला आहे. तालिबान संकटात असताना पाकिस्ताननं त्यांना मदत केली आहे. त्यामुळे आता पाकिस्तानसाठी तालिबान धावून येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
#PTI leader Neelam Irshad Sheikh: Taliban have announced that they will join hands with Pakistan to liberate Kashmir. pic.twitter.com/MfC7mQ6lLh
— SAMRI (@SAMRIReports) August 23, 2021
हे वाचा - नारायण राणेंच्या वक्तव्यानंतर चंद्रकांत पाटलांची महत्त्वाची प्रतिक्रिया
पाकिस्तान आणि तालिबानचे घनिष्ट संबंध
अफगाणिस्तानमध्ये तालिबानचं सरकार आल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी त्याचं जाहीरपणे आणि जोरदार स्वागत केलं होतं. तालिबानी हे सामान्य नागरिक असून त्यांनी त्यांचा स्वातंत्र्यलढा लढल्याचं इम्रान खान म्हणाले होते. सध्या अनेक तालिबानी नेते पाकिस्तानमध्ये वास्तव्याला असून चीन आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी तालिबानी सरकारचं स्वागत केलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Afghanistan, Jammu kashmir, Pakisatan, Taliban