लंडन 24 ऑगस्ट : अफगाणिस्तानवर तालिबाननं कब्जा केल्यानंतर (Taliban Regains Control of Afghanistan) अफगाणिस्तानातील प्रत्येक लहान मोठ्या हालचालीकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे. अशात आता अफगाणिस्तानवर (Afghanistan Crisis) होणाऱ्या जी 7 या बैठकीआधी सोमवारी तालिबाननं थेट अमेरिकेला (America) धमकी दिली आहे. तालिबाननं म्हटलं, की जर अमेरिका आणि ब्रिटेन (Britain) यांनी युद्धग्रस्त देशातून अमेरिकेच्या नेतृत्वाखालील सैन्याच्या माघारीची तारीख 31 ऑगस्टनंतरही पुढे वाढवली तर याचे गंभीर परिणाम सोसावे लागतील. कतरची (Katar) राजधानी दोहा येथे स्काई न्यूजसोबत बातचीत करताना तालिबानचे प्रवक्ते डॉक्टर सुहैल शाहीननं म्हटलं, की महिन्याच्या अखेरीसची ठरलेली डेडलाईन शेवटची तारीख आहे आणि ही तारीख पुढे ढकलण्याचा अर्थ होईल की देशात ते आणखी जास्त दिवस थांबणार.
दहशतवाद्याला फोटो काढण्याचा होता 'शौक'; शेवटी त्याचाच फोटो भिंतीवर टांगला
शाहीननं म्हटलं, की ही वेळीची सीमा स्वतः जो बायडेन यांनी ठरवली आहे आणि ब्रिटेन किंवा अमेरिकेनं ती आणखी पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्यास गंभीर परिणाम सोसावे लागतील. शाहीननं पुढे म्हटलं, ही लक्ष्मण रेषा आहे. राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी आपल्या सैन्य दलाच्या वापसीसाठी 31 ऑगस्ट ही तारीख निश्चित केली होती. अशात जर त्यांना ही तारीख पुढे आणखी वाढवायची असेल तर याचा अर्थ होतो, की गरज नसतानाही ते अफगाणिस्तानात थांबण्याच्या आपल्या या वेळेचा विस्तार करत आहेत.
तालिबान्यांनी सीमा ओलांडली; जेवण आवडलं नाही म्हणून भरचौकात महिलेला जाळलं
शाहीननं पुढे बोलताना म्हटलं, की जर अमेरिका आणि ब्रिटेनच्या लोकांना बाहेर निघण्यासाठी आणखी वेळ हवा असेल तर याचं उत्तर नाही असं आहे. अन्यथा याचे गंभीर परिणाम होतील. यामुळे आमच्यात अविश्वास निर्माण होईल. जर ते अजूनही अफगाणिस्तानात राहण्यावर जोर देत असतील तर हे आम्हाला कठोर पाऊलं उचलण्यास भाग पाडण्यासारखं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Afghanistan, Taliban