मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

अफगाणिस्तानातून आलं मोठं Update: पंजशीरचा पाडाव करण्यासाठी तालिबान आणि अल् कायदाची हातमिळवणी!

अफगाणिस्तानातून आलं मोठं Update: पंजशीरचा पाडाव करण्यासाठी तालिबान आणि अल् कायदाची हातमिळवणी!

अनेक प्रयत्न करूनही पंजशीरवर (Panjshir) ताबा (Control) मिळवण्यात यश येत नसल्याने आता तालिबानने दहशतवादी संघटना अल-कायदाची (Al Quida) मदत घेण्याचं निश्चित केल्याची माहिती आहे.

  • Published by:  desk news

काबुल, 3 सप्टेंबर : अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) तालिबाननं (Taliban) सत्ता प्रस्थापित केली असली, तरी पंजशीर मात्र अद्यापही तालिबानच्या ताब्यात आलेला नाही. अनेक प्रयत्न करूनही पंजशीरवर (Panjshir) ताबा (Control) मिळवण्यात यश येत नसल्याने आता तालिबानने दहशतवादी संघटना अल-कायदाची (Al Quida) मदत घेण्याचं निश्चित केल्याची माहिती आहे. ‘अल-अरेबिया’ या वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार अल कायदा आणि तालिबानने हातमिळवणी केली असून काहीही करून पंजशीरचा पाडाव करण्याचा विडा अल् कायदाने उचलला असल्याची माहिती देण्यात आली आहे.

पंजशीरचा कडवा लढा

पंजशीरमध्ये अफगाणिस्तान सैन्यातील अनेकजण सहभागी झाले असून काहीही झाले तरी तालिबानला शरण जाणार नसल्याची भूमिका जाहीर करण्यात आली आहे. एकीकडे तालिबान पंजशीरसोबत चर्चा करत असून दुसरीकडे गनिमी पद्धतीने हल्ले चढवण्याचाही प्रयत्न करत आहे. मात्र आतापर्यंत तालिबानकडून होणारे सर्व हल्ले पंजशीरनं परतवून लावले असून आपण चर्चा आणि युद्ध या दोन्ही गोष्टींसाठी तयार असल्याचं पंजशीरनं सांगितलं आहे.

अल कायदाची घेणार मदत

तालिबानी फायटर्सनी सर्व प्रयत्न करूनही पंजशीर हाती नसल्यामुळे अल कायदाचे प्रशिक्षित दहशतवादी आणि तालिबानी फायटर्स एकत्रितरित्या पंजशीरचा पाडाव करण्याची योजना आखत असल्याची माहिती आहे. नुकत्याच झालेल्या कारवाईत पंजशीरकडून 250 पेक्षा जास्त तालिबानी फायटर्सना यमसदनी धाडण्यात आलं होतं. त्यानंतर तालिबाननं पुन्हा एकदा नमती भूमिका घेतली असली, तरी पडद्याआडून पंजशीर काबीज करण्याच्या हालचाली सुरु असल्याचं चित्र आहे.

हे वाचा - काबुलमध्ये तालिबानविरोधात महिलांचा मोर्चा, बंदुकीला न घाबरता उठवला आवाज

पाकिस्तानची डोकेदुखी वाढळी

अफगाणिस्तानमुळे पाकिस्तानचीदेखील डोकेदुखी वाढली असून गेल्या काही दिवसांपासून अफगाणिस्तान सीमेवरील हालचाली वाढल्या आहेत. या भागातून घुसखोरीच्या अनेक घटना घटत असून दोन्ही देशांच्या सीमेवर गोळीबार होत असल्याचं सांगण्यात येत आहे. अल कायदा आणि तालिबानची युती पाकिस्तानला भविष्यात डोकेदुखी ठरण्याची शक्यता असल्यामुळे ही युती होऊ नये, यासाठी पाकिस्तानच आग्रही असल्याचं चित्र दिसत आहे.

First published:

Tags: Afghanistan, Taliban