मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

तालिबानी नेत्यांनी युके आणि इराणसमोर पसरला पदर; आर्थिक संकट गंभीर

तालिबानी नेत्यांनी युके आणि इराणसमोर पसरला पदर; आर्थिक संकट गंभीर

अफगाणिस्तानमध्ये तालिबानची सत्ता आल्यापासून  (Major financial crisis in Afghanistan) आर्थिक संकट गंभीर होत चाललं आहे.

अफगाणिस्तानमध्ये तालिबानची सत्ता आल्यापासून (Major financial crisis in Afghanistan) आर्थिक संकट गंभीर होत चाललं आहे.

अफगाणिस्तानमध्ये तालिबानची सत्ता आल्यापासून (Major financial crisis in Afghanistan) आर्थिक संकट गंभीर होत चाललं आहे.

  • Published by:  desk news

काबुल, 6 ऑक्टोबर : अफगाणिस्तानमध्ये तालिबानची सत्ता आल्यापासून  (Major financial crisis in Afghanistan) आर्थिक संकट गंभीर होत चाललं आहे. गेल्या काही आठवड्यांमध्ये सरकारी तिजोरीत पूर्णतः खडखडाट झाला असून (Taliban government has no money to run the nation) राज्यकारभार कसा चालवायचा, असा प्रश्न तालिबान सरकारला पडला आहे. तालिबानने एकीकडे सामान्य जनतेवर जुलूम करायला सुरुवात केली आहे, तर दुसरीकडे अन्नधान्यापासून सर्व जीवनावश्यक (Inflation and scarcity are main issues for common man) वस्तूंचा दुष्काळ असल्यामुळे सामान्य जनता मेटाकुटीला आली आहे.

तालिबानची इतर देशांकडे मदतीची मागणी

तालिबानने आता युके आणि इराणकडे आर्थिक मदतीची मागणी केली आहे. तालिबान सरकार सध्या संकटात असल्यामुळे अफगाणिस्तानसमोर मोठं आव्हान उभं ठाकलं आहे. अशा परिस्थितीत युके आणि इराणसारख्या देशांसमोर तालिबाननं पदर पसरायला सुरुवात केली आहे. अगोदर इराणच्या शिष्टमंडळाला तालिबानी सदस्य भेटले आणि त्यानंतर हेच सदस्य युकेच्या शिष्टमंडळालाही भेटले. आपण आयसीसच्या 11 दहशतवाद्यांना ठार केल्याचं सांगत सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न तालिबाननं केला आहे. काबुलमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाचा बदला घेण्यासाठी तालिबाननं आयसीस-खुरासान संघटनेच्या तळांवर हल्ले केले होते. आता त्याचा संदर्भ देऊन तालिबान स्वतःला दहशतवादविरोधी असल्याचं भासवण्याचा प्रयत्न करत आहे.

अमेरिकेसह सर्वांसोबत संबंध सुधारण्याची इच्छा

अमेरिकेकडून येणारी आर्थिक मदत बंद झाल्यामुळे तालिबान सरकारची मोठी पंचाईत झाली आहे. त्याचप्रमाणं इतर युरोपीय आणि पाश्चिमात्य देशांनी तालिबान सरकारला मान्यता दिलेली नाही. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरून येणारी मदत बंद आहे. देशात उत्पन्नाचं साधऩ नसल्यामुळे आणि सध्या सरकारकडे पैसे नसल्यामुळे परिस्थिती बिकट बनली आहे. सर्व राष्ट्रांसोबत आपले संबंध सुरळीत व्हावेत आणि पैशांचा ओघ सुरू व्हावा, अशी अपेक्षा तालिबानच्या प्रवक्त्यांनी सुरु केली आहे.

हे वाचा - अफगाणिस्तानात चोरीची भयंकर तालिबानी शिक्षा, 3 चोरांना गोळी मारुन लटकवलं JCB ला

आतापर्यंत तालिबान महिलांना देत असलेली वागणूक, अल-कायदा सारख्या संघटनांसोबत असणारे संबंध या निकषांच्या आधारे पाश्चिमात्य देशांकडून अफगाणिस्तानला मदत येत होती. मात्र आता सर्वसामान्य अफगाणि नागरिकांचे हाल पाहून अनेक देशांकडून मदतीचा ओघ सुरू होण्याची चिन्हं दिसू लागली आहेत.

First published:

Tags: Afghanistan, Iran, Taliban, Uk