Home /News /videsh /

तालिबान राज Begins : मुलींना बुरखा हवा, मुलामुलींमध्ये पडदा हवा; वाचा सविस्तर नियमावली

तालिबान राज Begins : मुलींना बुरखा हवा, मुलामुलींमध्ये पडदा हवा; वाचा सविस्तर नियमावली

अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) तालिबानची (Taliban) सत्ता येऊन तीन आठवडे उलटल्यानंतर आता शाळा महाविद्यालयांचे नियम (Rules for schools and colleges) निश्चित करण्यात आले आहेत.

    काबुल, 6 सप्टेंबर : अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) तालिबानची (Taliban) सत्ता येऊन तीन आठवडे उलटल्यानंतर आता शाळा महाविद्यालयांचे नियम (Rules for schools and colleges) निश्चित करण्यात आले आहेत. शाळेत जाताना मुलींना बुरखा (Brukha) घालणे बंधनकारक करण्यात आलं आहे. तर मुलं आणि मुली यांच्यामध्ये अपारदर्शक पडदा लावणं बंधनकारक असणार आहे. एकाच वर्गात बसलेली मुलं आणि मुली एकमेकांना  दिसणार नाहीत, याची खबरदारी शाळांना घ्यावी लागणार आहे. शाळांसाठी नवे नियम शाळांमध्ये जाणाऱ्या मुलींना बुरखा घालण्याची सक्ती असेल. शिवाय दिवसभरात कमीत कमी वेळा आपला चेहरा दिसेल, याची काळजीदेखील मुलींनी घ्यावी, असे आदेश तालिबाननं काढलें आहेत. शाळेत एका वर्गात जर मुले आणि मुली बसणार असतील, तर त्यांच्यामध्ये अपारदर्शक पडदा लावणं सक्तीचं असणार आहे. मुले आणि मुली एकमेकांना पाहू शकणार नाहीत, याची काळजी घ्यावी लागेल. कॉलेजसाठी वेगळे नियम कॉलेजमध्ये मुले आणि मुली एकत्र असणार नाहीत. मुलींसाठी वेगळे वर्ग भरवावे लागतील.  मुलींना शिकवण्यासाठी महिला शिक्षक असणं बंधनकारक करण्यात आलं आहे. त्यामुळे अफगाणिस्तानमध्ये महिला शिक्षकांच्या जागा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होणार आहेत. मात्र सध्या महिला शिक्षकांची संख्या कमी आहे. त्यामुळे ज्या शाळांमध्ये महिला शिक्षक नसतील, तिथे वयाने ज्येष्ठ शिक्षकांना मुलींना शिकवण्याची परवानगी मिळणार आहे. अशी परवानगी मिळण्यापूर्वी त्या शिक्षकाचं रेकॉर्ड आणि पूर्वीचं चारित्र्यदेखील तपासलं जाणार आहे. मुलींची शाळा लवकर सुटणार मुलांच्या शाळा आणि कॉलेजपेक्षा मुलींना 10 मिनिटं लवकरच सोडण्यात यावं, असा आदेशही तालिबाननं दिला आहे. मुली घरी निघून गेल्यानंतरच मुलांना वर्गातून बाहेर सोडलं जाईल. मुली आणि मुलं यांची एकमेकांशी भेट होऊ नये आणि त्यांनी आपसात कुठलीही चर्चा करू नये, यासाठी हा नियम करण्यात आल्याचं तालिबानकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. हे वाचा - निर्दय! पतीने बेशुद्ध करून तोंडात कोंबली LPG गॅसची पाईप, पत्नीचा तडफडून मृत्यू रस्त्यावर वाढली बुरखाधारी महिलांची संख्या तालिबानची सत्ता आल्यानंतर गेल्या 3 आठवड्यांत अफगाणिस्तानात रस्त्यावरून फिरणाऱ्या महिलांनी बुरखे घालायला सुरुवात केली आहे. त्या अगोदर अफगाणिस्तानात कमी महिला बुरखा वापरत असत. मात्र आता तालिबानच्या भीतीने महिलांनी बुरखा वापरायला सुरुवात केल्याचं चित्र आहे.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Afghanistan, School, Taliban

    पुढील बातम्या