Home /News /videsh /

पंतप्रधान मोदींच्या वक्तव्याची तालिबानकडून दखल, सहा दिवसांनी दिलं प्रत्युत्तर

पंतप्रधान मोदींच्या वक्तव्याची तालिबानकडून दखल, सहा दिवसांनी दिलं प्रत्युत्तर

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या वक्तव्याला तालिबाननं (Taliban) अखेर उत्तर (Reply) दिलं आहे.

    नवी दिल्ली, 26 ऑगस्ट : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या वक्तव्याला तालिबाननं (Taliban) अखेर उत्तर (Reply) दिलं आहे. भविष्यात भारत आणि तालिबानचे संबंध कसे असतील, याबाबत सध्या विविध अंदाज वर्तवण्यात येत आहेत. तालिबान आणि पाकिस्तान यांची जवळीक लक्षात घेता,  भारताची डोकेदुखी तालिबानमुळे वाढणार असल्याचीदेखील चर्चा रंगत आहे. या पार्श्वभूमीवर तालिबाननं भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्याला प्रत्युत्तर दिलं आहे. काय म्हणाले होते पंतप्रधान मोदी? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 20 ऑगस्ट रोजी केलेल्या भाषणात दहशतवादावर आसूड ओढले होते. दहशतवादाच्या आधारे फार काळ मानवतेचा दाबून ठेवता येणार नाही, असं विधान त्यांनी केलं होतं. गुजरातमधील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी दहशतवादाच्या मुद्द्यावर आपली मतं मांडली होती. तोडणाऱ्या शक्तींना नेहमी आपणच जिंकल्याचा भास होत असतो. मात्र हा विचार काही काळापुरता प्रभावी वाटला तरी सदासर्वकाळ तो प्रभावी राहू शकत नसल्याचं मोदी म्हणाले होते. दहशतवाद ही जगासमोरची सर्वात मोठी समस्या असून ती सोडवण्यासाठी प्रत्येकानं प्रयत्न करण्याची गरज असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं होतं. पंतप्रधान मोदींचं हे विधान तालिबानला इशारा असल्याची चर्चा जगभरात रंगली होती. तालिबाननं दिलं प्रत्युत्तर आम्ही कशा प्रकारे सुशासन आणतो, हे भारताला दाखवून देऊ, असं प्रत्युत्तर तालिबानचे प्रमुख नेते शहाबुद्दीन दिलावर यांनी पाकिस्तानी रेडिओला दिलेल्या मुलाखतीत दिलं आहे. त्याचप्रमाणं भारतानं अफगाणिस्तानच्या अंतर्गत बाबीत मध्यस्थी करू नये, असा इशाराही तालिबाननं दिला आहे. पाकिस्तान आमचा शेजारी देश असून पाकिस्तानसोबत घनिष्ट मैत्रीचे संबंध असल्याचंही तालिबाननं म्हटलं आहे. तीन लाख अफगाणी शरणार्थांना आश्रय दिल्याबद्दल तालिबाननं पाकिस्तानचे आभार मानले आहेत. हे वाचा -काबूलसाठी केंद्र सरकारनं घेतला मोठा निर्णय, लवकरच आखणार धोरण भारतानं तालिबानबाबतची आपली अधिकृत भूमिका अद्याप जाहीर केलेली नाही. भारत सरकारने तालिबानच्या सत्तेला मान्यताही दिलेली नाही आणि त्यावर थेट टीकादेखील केलेली नाही.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Afghanistan, Narendra modi, Taliban

    पुढील बातम्या