मराठी बातम्या /बातम्या /विदेश /दुतोंडी: तालिबानने फिरवला शब्द, काश्मीर प्रश्नात लक्ष घालण्याचं पाकिस्तानला आश्वासन

दुतोंडी: तालिबानने फिरवला शब्द, काश्मीर प्रश्नात लक्ष घालण्याचं पाकिस्तानला आश्वासन

काश्मीरमध्ये मुस्लिमांवर अऩ्याय होत असेल, तर आपण त्यात (Taliban promises Pakistan to into Kashmir issue) लक्ष घालू, असं आश्वासन तालिबाननं पाकिस्तानला दिलं आहे.

काश्मीरमध्ये मुस्लिमांवर अऩ्याय होत असेल, तर आपण त्यात (Taliban promises Pakistan to into Kashmir issue) लक्ष घालू, असं आश्वासन तालिबाननं पाकिस्तानला दिलं आहे.

काश्मीरमध्ये मुस्लिमांवर अऩ्याय होत असेल, तर आपण त्यात (Taliban promises Pakistan to into Kashmir issue) लक्ष घालू, असं आश्वासन तालिबाननं पाकिस्तानला दिलं आहे.

काबुल, 27 सप्टेंबर : काश्मीरमध्ये मुस्लिमांवर अऩ्याय होत असेल, तर आपण त्यात (Taliban promises Pakistan to into Kashmir issue) लक्ष घालू, असं आश्वासन तालिबाननं पाकिस्तानला दिलं आहे. अफगाणिस्तानमध्ये तालिबानची सत्ता आल्यानंतर काश्मीर हा भारत आणि पाकिस्तानचा अंतर्गत प्रश्न (Kashmir is internal issue of India and Pakistan said Taliban) असल्याचं तालिबाननं म्हटलं होतं. आपण केवळ अफगाणिस्तानमध्ये सुधाऱणा आणण्यासाठी प्रयत्न करणार असून इतर देशांच्या अंतर्गत प्रश्नांत आपल्याला रस नसल्याचं तालिबाननं सांगितलं होतं. आता मात्र तालिबाननं आपला शब्द फिरवला असून काश्मीरमध्ये हस्तक्षेप करण्याचं आश्वासन पाकिस्तान दिलं आहे.

काय दिलं आश्वासन?

तालिबानचे प्रवक्ते आणि माहिती प्रसारण मंत्री जबीहुल्लाह मुजाहिद यांनी पाकिस्तानच्या एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत हे आश्वासन दिलं आहे. जगात ज्या ज्या ठिकाणी मुस्लिमांवर अन्याय होत असेल, त्यांच्या प्रश्नात लक्ष घालण्यासाठी तालिबान सज्ज असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. पॅलेस्टाईन असो, काश्मीर असो किंवा म्यानमार असो, या सर्व ठिकाणी मुस्लिमांच्या हितासाठी आपला धोरणात्मक पाठिंबा असेल, असं त्यांनी या मुलाखतीत म्हटलं आहे.

हे वाचा - नव्या आठवड्यात नवा खेळ, Bigg Boss च्या घरात रंगणार 'जोडी की बेडी'चा भन्नाट टास्क

भारताची डोकेदुखी वाढली

अफगाणिस्तानमध्ये तालिबानची सत्ता आल्यानंतर भारताची डोकेदुखी वाढणार असल्याचा अंदाज यापूर्वीच वर्तवण्यात आला होता. अफगाणिस्तानचा विकास हेच आपलं लक्ष्य असून इतर राष्ट्रांच्या प्रश्नात आपण लक्ष घालणार नसल्याचं आश्वासन तालिबाननं दिलं होतं. मात्र आता पाकिस्तानला काश्मीरप्रश्नी मदत करण्याचं आश्वासन देत तालिबाननं शब्द फिरवला आहे. यावरून तालिबानचा दुतोंडीपणा समोर आला असून भारताला एक आणि पाकिस्तानला वेगळंच आश्वासन तालिबान देत असल्याचं दिसून आलं आहे. भारतासह जगातील अनेक देशांनी अद्याप तालिबान सरकारला मान्यता दिलेली नाही.

First published:

Tags: Afghanistan, Pakisatan, Taliban