मराठी बातम्या /बातम्या /विदेश /अफगाणिस्तानमधील ‘अखेरचा गड’ जिंकण्यासाठी तालिबानी सज्ज, अखेर ‘पंजशीरचा बछडा’ समर्पणाच्या तयारीत

अफगाणिस्तानमधील ‘अखेरचा गड’ जिंकण्यासाठी तालिबानी सज्ज, अखेर ‘पंजशीरचा बछडा’ समर्पणाच्या तयारीत

अफगाणिस्तानमधील (Afghanistan) जवळपास सर्व प्रदेश ताब्यात घेऊन सत्ता स्थापन केल्यानंतर आता तालिबान (Taliban) लवकरच पंजशीर भागदेखील (Panjashir area) जिंकून घेण्याच्या तयारीत आहे.

अफगाणिस्तानमधील (Afghanistan) जवळपास सर्व प्रदेश ताब्यात घेऊन सत्ता स्थापन केल्यानंतर आता तालिबान (Taliban) लवकरच पंजशीर भागदेखील (Panjashir area) जिंकून घेण्याच्या तयारीत आहे.

अफगाणिस्तानमधील (Afghanistan) जवळपास सर्व प्रदेश ताब्यात घेऊन सत्ता स्थापन केल्यानंतर आता तालिबान (Taliban) लवकरच पंजशीर भागदेखील (Panjashir area) जिंकून घेण्याच्या तयारीत आहे.

काबूल, 24 ऑगस्ट : अफगाणिस्तानमधील (Afghanistan) जवळपास सर्व प्रदेश ताब्यात घेऊन सत्ता स्थापन केल्यानंतर आता तालिबान (Taliban) लवकरच पंजशीर भागदेखील (Panjashir area) जिंकून घेण्याच्या तयारीत आहे. पंजशीरचा वाघ (Tiger of Panjshir) अशी ओळख असणाऱ्या अहमद शाह मसूद (Ahmad Shah Masood) यांचा मुलगा अहमद मसूद (Ahmad Masood) यांनी तालिबानसोबत शांतता कराराच्या वाटाघाटी सुरू केल्या आहेत. त्यामुळे लवकरच आता हा भूभागदेखील तालिबान आपल्या ताब्यात घेईल, अशी चिन्हे दिसू लागली आहेत.

काय आहे पंजशीलचं महत्त्व?

पंजशीर खोरं जिंकून घेणं यापूर्वी तालिबानला कधीच जमलेलं नाही. त्यापूर्वी सोव्हिएत रशियानंदेखील अफगाणिस्तानमध्ये सत्ता असताना पंजशीलवर आक्रमण करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र अमहद शाह मसूद यांच्या नेतृत्त्वाखाली सैन्याचं कडवी झुंज देत रशियाचा पराभव केला होता.  हे युद्ध अहमद मसूद यांनी जवळून पाहिलं होतं. वडिलांची परंपरा कायम राखत पंजशील तालिबानच्या ताब्यात जाऊ नये, यासाठी अहमद मसूद जिवाची बाजी लावत आहेत.

शस्त्रास्त्रं पडली कमी

तालिबानच्या तुलनेत आता अहमद मसूद यांच्या सैन्याकडील शस्त्रास्त्रं आणि दारुगोळा संपत चालला आहे. त्यामुळे तालिबानचा मुकाबला करणं त्यांना दिवसेंदिवस कठीण होत चाललं आहे. 32 वर्षं तालिबानविरोधात कडवी झुंज दिल्यानंतर आता सन्मानपूर्वक शस्त्रं खाली ठेवण्यासाठी काय तोडगा काढता येईल, याचा विचार अहमद आणि त्यांचे सहकारी करत असल्याची बातमी ‘द टेलिग्राफ’नं दिली आहे.

हे वाचा - 16 आठवड्यानंतरही लसीच्या दुसऱ्या डोससाठी 1.6 कोटी नागरिक Waiting List मध्ये

अनेक देशांकडे मागितली मदत

अहमद मसूद यांनी काही दिवसांपूर्वी ‘वॉशिंग्टन पोस्ट’मध्ये एक लेख लिहून अनेक देशांकडे मदतीची याचना केली होती. अमेरिका, युरोप, फ्रान्स आणि अरब देशांकडे त्यांनी मदतीची याचना केली होती. तालिबानविरुद्ध लढण्यासाठी आपल्याकडे कडवे सैनिक असले तरी पैसा आणि शस्त्रास्त्रं कमी पडत असल्याचं त्यांनी लिहिलं होतं. अहमद मसूद यांच्याकडे सध्या 6 हजार सैनिक असून ते अजूनही तालिबानशी लढत आहेत. तर ‘फायनान्शिअल टाईम्स’ला एका तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार पंजशीरमध्ये प्रवेश करणं तालिबानसाठी अत्यंत कठीण आहे. उंच शिखरं आणि बिकट वाटांचं आव्हान तालिबानला पार करणं वाटतं तितकं सोपं नाही.

First published:
top videos

    Tags: Afghanistan, Taliban