मराठी बातम्या /बातम्या /विदेश /माजी उपराष्ट्रपती सालेह यांच्या भावाची तालिबानकडून हत्या; आधी गळा कापला, मग घातल्या गोळ्या

माजी उपराष्ट्रपती सालेह यांच्या भावाची तालिबानकडून हत्या; आधी गळा कापला, मग घातल्या गोळ्या

अफगाणिस्तानचे (Afghanistan) माजी उपराष्ट्रपती अमरुल्लाह सालेह (Amarullah Saleh) यांच्या भावाची (Brother) तालिबाननं (Taliban) निर्घृण हत्या (Murder) केली आहे.

अफगाणिस्तानचे (Afghanistan) माजी उपराष्ट्रपती अमरुल्लाह सालेह (Amarullah Saleh) यांच्या भावाची (Brother) तालिबाननं (Taliban) निर्घृण हत्या (Murder) केली आहे.

अफगाणिस्तानचे (Afghanistan) माजी उपराष्ट्रपती अमरुल्लाह सालेह (Amarullah Saleh) यांच्या भावाची (Brother) तालिबाननं (Taliban) निर्घृण हत्या (Murder) केली आहे.

काबुल, 10 सप्टेंबर : अफगाणिस्तानचे (Afghanistan) माजी उपराष्ट्रपती अमरुल्लाह सालेह (Amarullah Saleh) यांच्या भावाची (Brother) तालिबाननं (Taliban) निर्घृण हत्या (Murder) केली आहे. त्याचा गळा चिरून आणि त्यानंतर त्यांना गोळ्या घालून ठार करण्यात आलं आहे. तालिबानच्या या पाशवी कृत्यानं अफगाणिस्तानमध्ये दहशत पसरली असून आपल्या राजकीय विरोधकांचा काटा काढायला तालिबाननं सुरुवात केल्याचं स्पष्ट झालं आहे.

पंजशीरमध्ये झाली हत्या

अफगाणिस्तानचे माजी उपराष्ट्रपती अमरुल्लाह सालेह यांनी नेहमीच तालिबानला आव्हान देण्याची भूमिका घेतली आहे. काही दिवसांपूर्वी आपणच अफगाणिस्तानचे काळजीवाहू राष्ट्राध्यक्ष असल्याचंही त्यांनी जाहीर केलं होतं. पंजशीरमधून ते तालिबानविरोधातील लढ्यात सहभागी झाले होते. त्यानंतर आता त्यांचे भाऊ रोहुल्लाह सालेह यांची तालिबानकडून निर्घृण हत्या करण्यात आली आहे.

अमरुल्लाह यांचे मौन

अमरुल्लाह सालेह यांनी या प्रकरणावर सध्या मौन बाळगलं आहे. त्यांनी या घटनेवर कुठलाही प्रतिक्रिया नोंदवलेली नाही. तालिबानला आव्हान देण्याची किंमत त्यांनी यापूर्वीदेखील चुकवली आहे. तालिबानकडून सालेह यांच्या बहिणीचीदेखील अमानूष हत्या करण्यात आली होती.

तालिबानने जारी केला व्हिडिओ

तालिबानला आव्हान देणारा व्हिडिओ अमरुल्लाह सालेह यांनी ज्या ठिकाणाहून जारी केला होता, त्याच ठिकाणाहून तालिबाननं आता नवा व्हिडिओ जारी केला आहे. सालेह यांनी काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ जारी करून आपण पंजशीरमध्येच असल्याचं जाहीर केलं होतं. आपण देश सोडून कुठेही जाणार नसून तालिबानविरोधात लढणार असल्याचं सालेह यांनी म्हटलं होतं. त्यानंतर आता पंजशीरवर ताबा मिळवलेल्या तालिबाननं सालेह यांच्या भावाला शोधून त्याची हत्या केली आहे.

हे वाचा - काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांच्या कुरापती सुरुच, सुरक्षा दलावर ग्रेनेड हल्ला

15 ऑगस्टला अफगाणिस्तानमध्ये तालिबानची सत्ता आल्यावर राष्ट्रपती अशरफ गनी यांनी देशातून पलायन केलं होतं. त्यानंतर उपरराष्ट्रपती अमरुल्लाह सालेह यांनी आपण काळजीवाहू राष्ट्रपती असल्याची घोषणा केली होती.

First published:
top videos

    Tags: Afghanistan, Taliban