मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

तालिबान आज सरकार स्थापन करण्याची शक्यता; पंजशीरवरही कब्जा केल्याचा दावा

तालिबान आज सरकार स्थापन करण्याची शक्यता; पंजशीरवरही कब्जा केल्याचा दावा

एका तालिबानी कमांडरने सांगितलं की, अल्लाहच्या कृपेनं आता अफगाणिस्तानमध्ये आमचं पूर्ण नियंत्रण आहे. आम्ही त्रास देणाऱ्यांना पराभूत केले आहे

एका तालिबानी कमांडरने सांगितलं की, अल्लाहच्या कृपेनं आता अफगाणिस्तानमध्ये आमचं पूर्ण नियंत्रण आहे. आम्ही त्रास देणाऱ्यांना पराभूत केले आहे

एका तालिबानी कमांडरने सांगितलं की, अल्लाहच्या कृपेनं आता अफगाणिस्तानमध्ये आमचं पूर्ण नियंत्रण आहे. आम्ही त्रास देणाऱ्यांना पराभूत केले आहे

  • Published by:  Kiran Pharate

काबूल 04 सप्टेंबर : अफगाणिस्तानमध्ये तालिबान सरकार स्थापनेच्या घोषणेच्या एक दिवस आधी शुक्रवारी तालिबानने दावा केला की त्यांनी पंजशीरवरही कब्जा केला (Taliban Seized the Panjshir Valley) आहे. आज तालिबान अफगाणिस्तानात आपलं सरकार स्थापन (Taliban Likely to Forming Government Today) करण्याची शक्यता आहे. तालिबानच्या सूत्रांच्या हवाल्यानं वृत्तसंस्था रॉयटर्सने सांगितलं की, तालिबाननं आता संपूर्ण अफगाणिस्तान ताब्यात घेतल्याचा दावा केला आहे. तालिबाननं सांगितलं, की आता पंजशीर आमच्या ताब्यात आहे. पंजशीर ताब्यात घेतल्यानंतर काबूलमधील तालिबानी लढाऊंनीही आनंद व्यक्त करत आकाशात गोळीबार केला.

एका तालिबानी कमांडरने सांगितलं की, अल्लाहच्या कृपेनं आता अफगाणिस्तानमध्ये आमचं पूर्ण नियंत्रण आहे. आम्ही त्रास देणाऱ्यांना पराभूत केले आहे आणि आता पंजशीर आमच्या नियंत्रणाखाली आहे. मात्र, तालिबानच्या पंजशीरबाबतच्या दाव्याला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

अफगाणी महिला न्यायाधीशांना जिवाची भीती, शिक्षा सुनावलेल्या कैद्यांची सुटका

दरम्यान, अफगाणिस्तानचे माजी उपराष्ट्रपती अमरुल्ला सालेह (Former Vice President Amrullah Saleh) यांनी त्यांच्या देश सोडल्याच्या बातम्या फेटाळून लावत ही बातमी खोटी असल्याचं म्हटलं आहे. याशिवाय, तालिबान्यांनी पंजशीर खोऱ्यावर कब्जा केल्याचीही त्यांनी पुष्टी केलेली नाही. अमरुल्ला सालेहनं ट्वीट केलं, की प्रतिकार चालू आहे आणि चालू राहील. मी माझ्या मातीसह इथे आहे, माझ्या मातीसाठी उभा आहे आणि त्याच्या सन्मानाचं रक्षण करतोय.

शुक्रवारी तालिबाननं नवीन अफगाणिस्तान सरकारच्या स्थापनेची तारीख एका दिवसासाठी पुढे ढकलली होती. नवीन अफगाणिस्तान सरकारची स्थापना जी शुक्रवारी केली जाणार होती, ती आता एक दिवस उशिरा होणार आहे, असे दहशतवादी गटाचे प्रवक्ते झबीउल्ला मुजाहिद यांनी शुक्रवारी सांगितलं. मुजाहिद म्हणाले की, नवीन सरकारच्या स्थापनेची घोषणा आता शनिवारी (आज) केली जाईल. सूत्रांनी सांगितलं की कतारमधील तालिबानच्या राजकीय कार्यालयाचे अध्यक्ष मुल्ला अब्दुल गनी बरदार हे तालिबान सरकारचे प्रमुख असण्याची शक्यता आहे.

काश्मीरच्या मुस्लिमांसाठी आवाज उठवू, तालिबानचा 24 तासांत यू-टर्न

अफगाणिस्तानातील 34 राज्यांपैकी एक असलेल्या पंजशीर घाटीच्या खासियतचा अंदाज यावरुनच लावता येऊ शकतो, की इथे कधीच तालिबान आपले पाय पसरू शकला नाही. आजही ही घाटी तालिबानच्या ताब्यात गेलेली नाही. 70 आणि 80 च्या दशकात सोवियत संघानंही हे ठिकाणी आपल्या ताब्यात घेण्याच पूर्ण प्रयत्न केला होता, मात्र यात ते अपयशी ठरले. पंजशीरला पंजशेर या नावानंही ओळखलं जातं. याचा अर्थ आहे, पाच सिंहांची घाटी.

First published:

Tags: Afghanistan, Taliban