• Home
 • »
 • News
 • »
 • videsh
 • »
 • तालिबानी नेते अखुंदजादा पहिल्यांदाच आले समोर, ‘तालिबानी फायटर्स’शी केली बातचित

तालिबानी नेते अखुंदजादा पहिल्यांदाच आले समोर, ‘तालिबानी फायटर्स’शी केली बातचित

अफगाणिस्तानमध्ये तालिबातनची (Taliban leader Akhundjada appears before fights for the first time) सत्ता आल्यापासून पहिल्यांदाच तालिबानचे सर्वोच्च नेते हैबतुल्ला अखुंदजादा हे सर्वांसमोर आले.

 • Share this:
  काबुल, 31 ऑक्टोबर : अफगाणिस्तानमध्ये तालिबातनची (Taliban leader Akhundjada appears before fights for the first time) सत्ता आल्यापासून पहिल्यांदाच तालिबानचे सर्वोच्च नेते हैबतुल्ला अखुंदजादा हे सर्वांसमोर आले. नेहमी लो-प्रोफाईल राहणाऱ्या आणि फारसा गाजावाजा न आवडणाऱ्या (Low profile and always hiding) अखुंदजादा यांना आतापर्यंत फारच कमी जणांनी प्रत्यक्ष पाहिलं होत. या कार्यक्रमाच्या निमित्तानं तालिबानी फायटर्सना (Akhundjada talks to Taliban fighters) त्यांच्या नेत्याचा चेहरा प्रत्यक्षात पाहता आला. हे होतं निमित्त तालिबानच्या वतीनं लढणाऱ्या सैनिकांना प्रोत्साहन देण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. 2016 सालानंतर पहिल्यांदाच अखुंदजादा यांनी तालिबानी सैनिकांना आपला चेहरा दाखवला आणि त्यांना संदेश दिला. तालिबानचं राज्य प्रस्थापित करण्यासाठी आपल्या प्राणांचं बलिदान देणाऱ्या फायटर्सना त्यांनी श्रद्धांजली वाहिली. या कार्यक्रमाचं कुठलंही व्हिडिओ चित्रिकरण करायला परवानगी नव्हती. त्यामुळे त्याचा कुठलाही व्हिडिओ किंवा फोटो प्रसिद्ध करण्यात आलेला नाही. ऑडिओ झाला प्रसारित अखुंदजादा तालिबानी फायटर्सना मार्गदर्शन करत असल्याची ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल झाली आहे. या भाषणात अखुंदजादा यांनी बहुतांश धार्मिक मुद्दे मांडले असून शरिया कायद्याच्या आधारावरच तालिबान कारभार करत राहिल, असं म्हटलं आहे. हे वाचा- तालिबानची क्रूरता; लग्नाच्या कार्यक्रमात संगीत लावल्याने 13 जणांची निर्घृण हत्या कोण आहेत अखुंदजादा? अखुंदजादा हे तालिबानचे सर्वोच्च नेते मानले जातात. तालिबानच्या संकटाच्या काळात सघटनेची जबाबदी अखुंदजादा यांच्यावर सोपवण्यात आलीह होती. त्यानंतर त्यांनी संघटनेची मोर्चेबांधणी करत अमेरिकेविरोधातील लढा सुरू ठेवला होता. 2016 सालच्या ड्रोन हल्ल्यात तालिबानचे तत्कालीन नेते मुल्ला अख्तर मंसूर मारले गेल्यानंतर अखुंदजादा यांच्याकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली होती. अल् कायदा या दहशतवादी संघटनेचा प्रमुख अल् जवाहिरी याच्यासोबत अखुंदजादा यांनी संधान साधत आपली ताकद वाढवली होती. सध्या तालिबानचे ते सर्वोच्च नेते मानले जात असून सत्तेतील प्रमुखपदावर त्यांचा डोळा असल्याची जोरदार चर्चा आहे.
  Published by:desk news
  First published: