Home /News /videsh /

तालिबानने चौघांचे मृतदेह टांगले चौकात, किडनॅपिंग केल्याची सैतानी शिक्षा

तालिबानने चौघांचे मृतदेह टांगले चौकात, किडनॅपिंग केल्याची सैतानी शिक्षा

तालिबाननं चार व्यक्तींना ठार करून त्यांचे मृतदेह चौकाचौकात (Taliban killed 4 persons and hanged bodies in public places) टांगून जनतेला इशारा दिल्याची घटना समोर आली आहे.

    काबुल, 26 सप्टेंबर : तालिबाननं चार व्यक्तींना ठार करून त्यांचे मृतदेह चौकाचौकात (Taliban killed 4 persons and hanged bodies in public places) टांगून जनतेला इशारा दिल्याची घटना समोर आली आहे. अफगाणिस्तानमध्ये तालिबानचं राज्य आल्याचे परिणाम (Effects of Taliban government) दिसायला सुरुवात झाली आहे. शरिया कायदा आणि क्रूर शिक्षा हे वैशिष्ट्यं असणाऱ्या तालिबाननं वेगवेगळ्या गुन्हेगारांना अमानवी पद्धतीच्या शिक्षा द्यायला सुरुवात केल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. अपहरण अमान्य देशात कुणीही कुणाचंही अपहरण करणं अमान्य असल्याचा संदेश देण्यासाठीच आपण ही कृती केल्याचं तालिबानच्या वतीनं सांगण्यात आलं आहे. चार व्यक्तींनी इतरांचं अपहरण केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. या चौघांना ठार करून त्यांचे मृतदेह एका चौकात आणण्यात आले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या या मृतदेहांना लटकवण्यासाठी चार क्रेन मागवण्यात आल्या. त्यानंतर या  क्रेननं मृतदेह उचलून ते चौकात टांगण्यात आले. चार जागी चार मृतदेह देशातील वेगवेगळ्या भागातील नागरिकांना संदेश देण्यासाठी चार वेगवेगळ्या भागात हे मृतदेह लटकवण्यात आले. चार क्रेन चार वेगवेगळ्या भागात पाठवण्यात आल्या आणि त्याला हे मृतदेह लटकवण्यात आले. पोलिसांनी या अपहऱणकर्त्यांना पकडताना त्यांना ठार केलं की पकडून आणून नंतर त्यांना गोळ्या घातल्या, याबाबत कुठलाही माहिती तालिबानच्या वतीनं देण्यात आलेली नाही. मात्र यापुढे किडनॅपिंग करणाऱ्या प्रत्येकाला याच प्रकारची शिक्षा देण्यात येईल, असं उपराज्यपाल मुहाजिर यांनी माध्यमांना सांगितलं आहे. हे वाचा - महिला जेलरचा जडला कैद्यांवर जीव, रात्री गुपचूप जात होती कोठडीत आणि... काय होती घटना शनिवारी सकाळी एक व्यापारी आणि त्याच्या मुलाचं अपहरण झाल्याची तक्रार पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी काबुलमधून बाहेर पडणारे सर्व रस्ते बंद केले आणि तपास सुरू केला. तालिबानी फायटर्सनी अपहऱणकर्त्यांचा शोध सुरू केला. काही वेळात चार अपहरणकर्ते सापडले. मात्र त्यांनी फायटर्सना पाहताच गोळीबार सुरु केला. त्यात एक तालिबानचा एक फायटर जखमी झाला तर चारही अपहरणकर्ते मारले गेल्याचं त्यांनी म्हटलं आहे. मात्र घटनास्थळीते मारण्यात आले की नंतर मारण्यात आले, या प्रश्नाचं उत्तर त्यांनी टाळलं.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Afghanistan, Taliban

    पुढील बातम्या