मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

पाकिस्तान सीमेवर तालिबानला लॉटरी, 'असं' मिळालं 300 कोटींचं घबाड

पाकिस्तान सीमेवर तालिबानला लॉटरी, 'असं' मिळालं 300 कोटींचं घबाड

तालिबाननं (Taliban) नुकत्याच काबीज केलेल्या पाकिस्तान सीमेजवळच्या (Pakistan Border) एका चौकीत त्यांना तब्बल 300 कोटी रुपये (300 crore pakistani rupee) सापडल्यामुळे मोठं घबाड (Lottery) हाती लागलं आहे.

  • Published by:  desk news
नवी दिल्ली, 14 जुलै : तालिबाननं (Taliban) नुकत्याच काबीज केलेल्या पाकिस्तान सीमेजवळच्या (Pakistan Border) एका चौकीत त्यांना तब्बल 300 कोटी रुपये (300 crore pakistani rupee) सापडल्यामुळे मोठं घबाड (Lottery) हाती लागलं आहे. तालिबानकडून रोज अफगाणिस्तानमधील (Afganistan) वेगवेगळ्या भागात हल्ले केले जात असून आतापर्यंत सुमारे 85 टक्के भूभाग त्यांनी ताब्यात घेतल्याचं सांगण्यात आलं आहे. असं सापडलं घबाड अमेरिकेनं आपलं सैन्य माघारी घेण्याच्या निर्णय घेतल्यानंतर आता तालिबाननं तिथल्या अमेरिका पुरस्कृत सरकारच्या नाकी नऊ आणले आहेत. अफगाणिस्तानमधील बहुतांश भाग सध्या तालिबाननं आपल्या प्रभावाखाली आणला असून नुकतंच पाकिस्तान सीमेजवळच्या एका चौकीवर त्यांनी आक्रमण केलं. या आक्रमणाला घाबरून अफगाणी सैनिकांनी तिथून पळ काढला. या चौकीचा ताबा घेतल्यानंतर तिथं लपवून ठेवलेले सुमारे 300 कोटी पाकिस्तानी रुपये तालिबानच्या हाती लागले. हे पैसे कुठून आले, याबाबत सध्या उलटसुलट चर्चा सुरू आहे. तालिबानकडून खुलासा पैसे सापडल्याची ही बाब लपवून न ठेवता तालिबाननं ती जाहीर केली आहे. तालिबाननं आपला हेतू हा इस्लामिक राजवट प्रस्थापित करण्याचा असल्याचं म्हटलं आहे. या कार्यात सापडलेल्या पैशांचा उपयोग करणार असल्याची भूमिका तालिबाननं मांडली आहे. पाकिस्तानचा खुलासा पाकिस्तानातून अफगाणिस्तान ये-जा करणाऱ्या व्यापाऱ्यांना लुबाडून अफगाण सैनिक हे पैसे लाचेच्या स्वरूपात स्विकारत होते. त्यातून एवढी मोठ्ठी रक्कम साठवून ठेवण्यात आली होती,असा दावा पाकिस्ताननं केला आहे. हे पैसे पाकिस्तानी चलनातील असले, तरी पाकिस्तान-अफगाणिस्तान प्रवास करणाऱ्या व्यापाऱ्यांकडून ते चौकीत पोहोचले असावेत, असा संशय पाकिस्ताननं व्यक्त केला आहे. हे वाचा -धर्मांतराबाबत इम्रान खान यांच्या 'या' प्रस्तावाला पाकिस्तानमध्येच होतोय विरोध मोक्याच्या जागेवर ताबा तालिबाननं काबीज केलेली चौकी ही पाकिस्तान सीमेला लागून आहे. पाकिस्तानमधून अफगाणिस्तानमध्ये ये-जा करण्यासाठीच्या मुख्य मार्गालगत असलेली ही चौकी तालिबानच्या ताब्यात येणं, हा अफगाण सरकारसाठी मोठा धक्का मानला जात आहे. लवकरच याची शहानिशा करून चौक्या परत मिळवण्यात येतील, अशी प्रतिक्रिया अफगाण सरकारनं दिली आहे
First published:

Tags: Afghanistan, Pakisatan

पुढील बातम्या