Home /News /videsh /

क्रूर! तालिबाननं आंदोलक महिलेला गोळी मारून केलं ठार, कडेवर होतं 6 महिन्यांचं बाळ

क्रूर! तालिबाननं आंदोलक महिलेला गोळी मारून केलं ठार, कडेवर होतं 6 महिन्यांचं बाळ

तालिबान सरकारमध्ये (Taliban Government) महिलांना (women's rights) समान अधिकार मिळावेत, यासाठी आंदोलन करणाऱ्या एका महिलेला तालिबानी फायटर्सनी (Taliban Fighters) गोळ्या घालून ठार (Killed) केलं आहे.

    काबुल, 13 सप्टेंबर : तालिबान सरकारमध्ये (Taliban Government) महिलांना (women's rights) समान अधिकार मिळावेत, यासाठी आंदोलन करणाऱ्या एका महिलेला तालिबानी फायटर्सनी (Taliban Fighters)  गोळ्या घालून ठार (Killed) केलं आहे. तालिबानच्या क्रौर्याची परिसीमा म्हणजे या महिलेच्या कडेवर तिचं 6 महिन्याचं बाळ असतानाही तिला गोळी घालून ठार कऱण्यात आलं. त्यामुळं महिलेच्या कुटुंबीयांना आणि मुलांना जबर धक्का बसला आहे. असा झाला गोळीबार अफगाणिस्तानातील 30 वर्षांची फरवा तालिबानच्या जुलमी राजवटीला विरोध कऱण्यासाठी रस्त्यावर उतरली होती. रोज ती तालिबानविरोधी आंदोलनात सहभागी होत होती. या आंदोलनाची तिच्या पतीला भीती वाटत असे. या आंदोलनामुळे जिवाला धोका निर्माण होण्याची भीती तिच्या पतीने अनेकदा व्यक्त केली होती. मात्र तरीही हे आंदोलन करणं गरजेचं आहे असं फरवाचं मत होतं. नेहमीप्रमाणे फरवा आंदोलनासाठी बाहेर पडली. तिच्यासोबत तिचा केवळ 6 महिन्यांचा मुलगा होता. तर 3 वर्षांची मुलगी घरात होती. घरातून बाहेर पडतान तिच्यावर तालिबान्यांनी अमानूष गोळीबार केला. या गोळीबारात फरवा ठार झाली. कडेवर असणाऱ्या मुलाला सांभाळत तिनं कसाबसा आपला देह जमिनीवर ठेवला. आपल्या आईला नेमकं काय झालंय, हे त्या 6 महिन्याच्या बाळाला काय कळणार? ते बिचारं प्राण गेलेल्या आईच्या कुशीत रडू लागलं आणि आई उठण्याची वाट पाहू लागलं. फरवाच्या पतीला ही घटना समजताच त्याच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. त्यानं घटनास्थळी धाव घेत ते हृदयद्रावर चित्र पाहिलं. मरण पावलेल्या आपल्या पत्नीच्या जवळ असलेलं 6 महिन्यांचं बाळ त्यानं उचललं. आईला काय झालं, अशी त्याची 3 वर्षांची मुलगी विचारत होती. त्यावर आई झोपली आहे, असं उत्तर त्याने तिला दिलं. सहा महिन्यांच्या बाळालादेखील जखमा झाल्यामुळे त्याला उपचारांसाठी इस्पितळात दाखल करण्यात आलं. हे वाचा - हनिमूनसाठी गेलं होतं दाम्पत्य, पतीमुळे पुरती फजिती; बिचारी पत्नी एकटीच परतली घरी बाळाची प्रकृती हळूहळू सुधारत आहे. हे बाळ आणि त्याची 3 वर्षांची मुलगी आपली आई कधी परत येणार, याची वाट पाहत आहेत. आपल्या मुलांना कसं समजवावं, या विवंचनेत त्यांचा बाप आहे. तालिबानच्या क्रूर कृत्यांमुळे सर्वसामान्य अफगाणि जनतेचं आयुष्य उद्धवस्त होत आहे.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Afghanistan, Taliban

    पुढील बातम्या