Home /News /videsh /

तालिबान फायटर्सना करायचंय लग्न, मागवली 15 वर्षांखालील तरुणींची यादी

तालिबान फायटर्सना करायचंय लग्न, मागवली 15 वर्षांखालील तरुणींची यादी

अफगाणिस्तानमधील सर्व धर्माच्या प्रमुखांनी आपापल्या भागातील मुलींची यादी (List of young girls) तालिबानकडे सोपावावी, असा फतवा (Dictate) काढण्यात आला आहे.

    नवी दिल्ली, 16 जुलै: अमेरिकनं (USA) आपलं सैन्य माघारी (Military returns) घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर तालिबाननं (Taliban) अफगाणिस्तानमधील (Afganistan) बहुतांश भूभाग जिंकून घ्यायला सुरुवात केली आहे. अफगाणिस्तानमधील सर्व धर्माच्या प्रमुखांनी आपापल्या भागातील मुलींची यादी (List of young girls) तालिबानकडे सोपावावी, असा फतवा (Dictate) काढण्यात आला आहे. 15 वर्षांखालील सर्व मुली आणि 45 वर्षांखालील विधवा यांच्याशी तालिबान फायटर्स लग्न करणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. काय आहे फतवा? अफगाणिस्तानमधील वेगवेगळ्या भागातील अविवाहित तरुणी आणि विधवा यांच्याशी तालिबानी फायटर्स लग्न करणार असून त्यांची यादी लवकरात लवकर देण्याचे आदेश तालिबाननं जारी केले आहेत. यातील मुस्लिम नसणाऱ्या मुलींना पाकिस्तानमध्ये नेऊन त्यांचं धर्मपरिवर्तन केलं जाईल आणि त्यानंतर तालिबान फायटर्स त्यांच्याशी लग्न करतील, अशी योजना आखण्यात आली आहे. दाढी वाढवण्याचा इशारा अफगाणिस्तानात पुन्हा एकदा तालिबानी पद्धतीनं इस्लामी राज्य प्रस्थापित होणार असून पुरुषांनी दाढी वाढवायला सुरुवात करावी, असे आदेश काढण्यात आले आहेत. महिलांनी शाळेत जाणं बंद करावं, महाविद्यालयीन शिक्षणापासून दूर राहावं, असाही फतवा काढण्यात आला आहे. वीस वर्षांपूर्वी जशी परिस्थिती तालिबानमध्ये होती, तशीच परिस्थिती पुन्हा निर्माण करण्याचा तालिबानचा प्रयत्न सुरू आहे. तालिबानचा जुलूम सुरू अमेरिकेनं आक्रमण करण्यापूर्वी तालिबानची सत्ता असणाऱ्या अफगाणिस्तानमध्ये महिलांच्या शिक्षणावर बंदी होती. महिलांना घराबाहेर पडणं आणि नोकरी, कामधंदा करणं हे निशिद्ध मानलं जात होतं. कुठल्याही महिलेनं एकटं बाहेर फिऱणं हा गुन्हा होता. पुरुषांच्या गराड्यात महिलेनं बुरखा घालूनच बाहेर पडण्याचा नियम तालिबानचा होता. त्याचप्रमाणं वयाच्या 18 वर्षापर्यंत मुलीचं लग्न न होणं हा देखील गुन्हा होता. आता तालिबानी फायटर्स घरोघरी जाऊन 18 वर्षांवरील कुणी अविवाहित मुलगी आहे का, हे तपासत आहेत.  हे सर्व नियम पुन्हा प्रस्थापित करण्याचा तालिबानचा मानस आहे. हे वाचा - BREAKING: भारतीय पत्रकाराची अफगाणिस्तानात हत्या संघर्ष अटळ गेल्या वीस वर्षांत अफगाणिस्तानचं चित्र कमालीचं बदललं आहे. तिथल्या मुली शिकल्या आहेत. अनेकजणी नोकरी करत आहेत, स्वतःचे व्यवसाय करत आहेत. अशा परिस्थितीत पुन्हा तालिबानची सत्ता येण्याची चाहूल लागल्यामुळे सर्वत्र मोठी अस्वस्थता पसरत असल्याचं चित्र आहे.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Afghanistan, Taliban

    पुढील बातम्या