काबुल, 5 ऑक्टोबर : अफगाणिस्तानमध्ये गेल्या 20 वर्षात ज्या ज्या (Taliban declares all degrees in last 20 years invalid) तरुणांनी पदव्या घेतल्या आहेत, त्या सर्व अवैध ठरवण्याची घोषणा तालिबानने केली आहे. अफगाणिस्तावर अमेरिका पुरस्कृत सरकारचं (Degrees in US era will be invalid now) राज्य असताना ज्या ज्या तरुणांनी पदव्या संपादन केल्या आहेत, त्या सर्व अमान्य असल्याचा फतवा तालिबाननं काढला आहे. खरं शिक्षण हे केवळ मदरशांमध्ये (Only education in madrassas) देण्यात येत असून अमेरिकेच्या प्रभावाखाली आखलेल्या शिक्षणपद्धतीतील पदव्या यापुढे अफगाणिस्तानात गृहित धरल्या जाणार नाहीत, असं तालिबाननं म्हटलं आहे.
या 20 वर्षांतील डिग्री अमान्य
तालिबाननं केलेल्या घोषणेनुसार 2000 ते 2020 या कालावधीत देण्यात आलेल्या सर्व पदव्या अवैध आहेत. ही पदवी धारण केलेल्या कुणालाही त्याच्या आधारे नोकरी मिळू शकणार नाही. काबुल विद्यापीठातील सर्व प्राध्यापकांसोबत तालिबाननं घेतलेल्या बैठकीत हा मुद्दा मांडला. अफगाणिस्तानचे उच्च शिक्षणमंत्री अब्दुल बकी हक्कानी यांनी सर्व प्राध्यापकांसमोरच या निर्णयाची घोषणा केली. अमेरिकेने आखलेल्या शैक्षणिक धोरणाचा अफगाणिस्तानच्या विकासात काहीही फायदा होऊ शकत नाही. पाश्चिमात्य विचार आणि पाश्चिमात्य संस्कृतीचे धडे देणारं शिक्षण अफगाणिस्तानच्या भवितव्यासाठी योग्य नसल्याचा दावा तालिबाननं केला आहे.
हे वाचा - आईची केली हत्या; मग घरातच मृतदेहासोबत काढले 2 महिने, कारण जाणून पोलिसही हादरले
तरुणांमध्ये अस्वस्थता
अफगाणिस्तामधील बहुतांश लोकसंख्या ही 30 वर्षांखालील आहे. सध्या पदवीधर असलेला आणि नोकरीच्या शोधात असलेला तरुण वर्ग हा याच काळात पदवी संपादन केलेला वर्ग आहे. तालिबानच्या या एका निर्णय़ामुळे या सर्वांची पदवी निरर्थक ठरणार आहे. आयुष्याची पहिली 15 वर्षं गुंतवणूक करून मिळालेली पदवी आता निरर्थक ठरणार असल्यामुळे कोट्यवधी तरुणांच्या डोळ्यांसमोर भविष्यातील संकटं उभी राहत आहेत. आम्ही जगायचं तरी कसं, असा प्रश्न अफगाणिस्तानातील तरुणांना पडला आहे. तालिबाननं मात्र आपण या निर्णयावर ठाम असल्याचं सांगत मदरशातील शिक्षण हे ग्राह्य मानलं जाणार असल्याचं म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Afghanistan, Education, Taliban