Home /News /videsh /

तालिबानने दाखवले खरे रंग, महिलांच्या मंत्रालयात महिलांनाच बंदी

तालिबानने दाखवले खरे रंग, महिलांच्या मंत्रालयात महिलांनाच बंदी

महिलांसाठीच्या मंत्रालयात (Ministry for women) महिलांनाच प्रवेश देण्यात येत नसल्याचं (No entry for women) चित्र तालिबानी (Taliban) राजवटीत दिसू लागलं आहे.

    काबुल, 17 सप्टेंबर : अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) तालिबानचं (Taliban) राज्य आल्यानंतर ज्या ज्या गोष्टींची भीती व्यक्त करण्यात येत होती, त्या सर्व गोष्टी खऱ्या ठरताना दिसत आहेत. अफगाणिस्तानमध्ये तालिबानचं सरकार सत्तेवर आल्यानंतर महिलांबाबतची तालिबानची बुरसटलेली मतं राज्यकारभार दिसायला सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे महिलांसाठीच्या मंत्रालयात (Ministry for women) महिलांनाच प्रवेश देण्यात येत नसल्याचं (No entry for women) चित्र तालिबानी (Taliban) राजवटीत दिसू लागलं आहे. महिलांसाठी मंत्रालयात जाणाऱ्या चार महिलांना तालिबाननं रोखलं असून त्यांना परत पाठवण्यात आल्याची घटना नुकतीच घडली आहे. नेमकं काय घडलं? अफगाणिस्तानमध्ये अमेरिका पुरस्कृत सरकार असताना सर्व मंत्रालयांमध्ये महिलांचा सहभाग होता. त्यापैकी महिलांसाठीच्या मंत्रालयात सर्वाधिक महिला होत्या. मात्र आता तालिबानची सत्ता आल्यानंतर चित्र पालटलं आहे. महिलांसाठीच्या मंत्रालयात कामासाठी जाऊ पाहणाऱ्या चार महिलांनाच प्रवेश नाकारण्यात आला. ज्या मंत्रालयात पुरुष काम करतात, त्या मंत्रालयात महिलांना जायला परवानगी नसल्याचं तालिबानच्या वतीनं सांगण्यात आलं. महिलांचा एल्गार या घटनेनंतर महिलांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला असून आपल्याला आपले हक्क मिळावेत, यासाठी आंदोलन सुरु केलं आहे. तालिबानी राजवटीत महिलांचे अधिकार मान्यच करण्यात आले नसून मंत्रीमंडळात एकाही महिला मंत्र्याचा समावेश करण्यात आलेला नाही. हे वाचा - पाकिस्तानात अंत्यविधीवेळी नमाजादरम्यान दोन गटात गोळीबार, 8 जणांचा मृत्यू तालिबानचं महिलांबाबतचं मत महिला मंत्रालयात काम करू शकत नाहीत. त्या केवळ मुलं जन्माला घालण्याचं काम करू शकतात आणि त्यांनी तेच करावं, असं अधिकृत विधान तालिबानच्या प्रवक्त्यांनी केलं आहे. तालिबाननं आता महिलांना राज्यकारभारात काहीही स्थान नसेल, हे स्पष्ट केलं आहे. त्यामुळे अफगाणिस्तानातील महिला तालिबानविरोधात आंदोलन पुकारत असून अनेक महिलांवर तालिबानकडून खुनी हल्ले केले जात आहेत. रशियन वृत्तसंस्था स्पुटनिकनं दिलेल्या बातमीनुसार मंत्रालयात प्रवेश करणाऱ्या महिलांना तालिबानकडून रोखण्यात आलं असून त्यांना पुन्हा मंत्रालयात न फिरकण्याचा इशाराही देण्यात आला आहे. यापूर्वीदेखील तालिबानकडून महिलांवर करण्यात आलेल्या अत्याचाराच्या अनेक कहाण्या प्रसिद्ध आहेत. महिलांना समान न्याय देण्याची भाषा करणाऱ्या तालिबानने सत्ता येताच घूमजाव करून आपले रंग दाखवले आहेत.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Afghanistan, Taliban, Women

    पुढील बातम्या