Home /News /videsh /

Afghanistan Crisis: पंजशीरवर चालून आलेल्या तालिबान्यांना खिंडीत गाठलं; 350 जणांना धाडलं यमसदनी तर 40 कैदेत

Afghanistan Crisis: पंजशीरवर चालून आलेल्या तालिबान्यांना खिंडीत गाठलं; 350 जणांना धाडलं यमसदनी तर 40 कैदेत

जवळपास 350 तालिबान बंडोखोरांना मारल्याची माहिती समोर आली आहे... 1996 मधील फोटो (AP)

जवळपास 350 तालिबान बंडोखोरांना मारल्याची माहिती समोर आली आहे... 1996 मधील फोटो (AP)

Afghanistan Crisis: काल रात्री पंजशीर खोऱ्यात घुसण्याचा प्रयत्न (Taliban Enters in Panjshir valley) करणाऱ्या जवळपास 350 तालिबान बंडोखोरांना मारल्याची (350 taliban died) माहिती नॉर्दन आघाडीकडून (Northern alliance claim) देण्यात आली आहे.

पुढे वाचा ...
    काबूल, 01 सप्टेंबर: तालिबान दहशतवादी संघटनेनं अफगाणिस्तानवर ताबा (Taliban Control Afghanistan) मिळवल्यानंतर देशात अराजक पसरलं आहे. 30 ऑगस्ट रोजी अमेरिकन सैन्य पूर्णपणे माघारी (American Troops went back) गेल्यानंतर तालिबानला अफगाणिस्तानात खुलं मैदान मिळालं आहे. अलीकडेच तालिबाननं शांततेत सरकार स्थापन करणार असल्याची घोषणा केली आहे. पण दुसरीकडे मात्र त्यांनी पंजशीर खोरं ताब्यात घेण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. पण काल रात्री खावक याठिकाणी पंजशीर खोऱ्यात घुसण्याचा प्रयत्न (Taliban Enters in Panjshir valley) करणाऱ्या जवळपास 350 तालिबान बंडोखोरांना मारल्याची (350 taliban died) माहिती नॉर्दन आघाडीकडून (Northern alliance claim) देण्यात आली आहे. याबाबतच ट्वीट त्यांच्याकडून करण्यात आलं आहे. तसेच चाळीसहून अधिक तालिबानी बंडखोरांना ताब्यात घेतल्याचंही नॉर्दन आघाडीकडून सांगण्यात आलं आहे. यावेळी अमेरिकेची लढाऊ वाहनं आणि काही आधुनिक हत्यारंही हाती लागल्याची माहिती नॉर्दन आघाडीनं दिली आहे. यापूर्वी मंगळवारी रात्री देखील पंजशीरमध्ये घुसण्याचा प्रयत्नात असणाऱ्या तालिबानसोबत नॉर्दन आघाडीच्या सैन्यांची धुमश्चक्री झाल्याची माहिती समोर आली होती. हेही वाचा-तालिबान्यांनी हेलिकॉप्टरला प्रेत टांगून फिरवलं? पाहा VIRAL VIDEO मागील सत्य स्थानिक पत्रकार नातिक मलिकजादा यांनी केलेल्या ट्विटनुसार, अफगाणिस्तानच्या पंजशीरच्या प्रवेशद्वारावर गुलबहार परिसरात तालिबान बंडखोर आणि नॉर्दन आघाडीच्या सैन्यांत चकमक झाली आहे. एवढंच नाही तर तालिबान्यांनी येथील एक पूल देखील उडवल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. याशिवाय काही सैनिकांना पकडल्याचं वृत्तही समोर आलं आहे. हेही वाचा-काश्मीर अभी बाकी है! तालिबानच्या विजयी घोषणेनंतर अल कायदाचं मोठं विधान, म्हणाले. याआधी सोमवारी रात्री देखील तालिबान आणि नॉर्दन आघाडीच्या सैनिकांमध्ये गोळीबार झाला आहे. तेव्हा 7 ते 8 तालिबान बंडोखोरांना मारल्याची माहिती समोर आली होती. विशेष म्हणजे तालिबाननं संपूर्ण अफगाणिस्तानवर ताबा मिळवला असला, तरी पंजशीर खोरं अजून नियंत्रणाबाहेर आहे. याठिकाणी अहमद मसूद यांच्या नेतृत्वाखाली नॉर्दन आघाडी तालिबानच्या विरोधात आपला लढा देत आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Afghanistan, Taliban

    पुढील बातम्या