मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

EYE FOR EYE: ISIS च्या तळांवर तालिबानचा हल्ला, काबुल स्फोटाचा घेतला बदला

EYE FOR EYE: ISIS च्या तळांवर तालिबानचा हल्ला, काबुल स्फोटाचा घेतला बदला

अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये झालेल्या (Taliban attacks center of ISIS-K after Kabul bomb blast) बॉम्बस्फोटानंतर तालिबाननं आयसीस-खुरासानच्या तळांवर हल्ला करून बदला घेतला आहे.

  • Published by:  desk news

काबुल, 4 ऑक्टोबर : अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये झालेल्या (Taliban attacks center of ISIS-K after Kabul bomb blast) बॉम्बस्फोटानंतर तालिबाननं आयसीस-खुरासानच्या तळांवर हल्ला करून बदला घेतला आहे. रविवारी काबुलच्या मशिदीमध्ये जोरदार बॉम्बस्फोट झाला होता. या स्फोटात 5 अफगाणि (5 dead in Kabul bomb blast) नागरिकांचा मृत्यू झाला होता. तालिबानी प्रवक्त्याच्या आईची शोकसभा सुरु असताना ईदगाह मशिदीच्या परिसरात जोरदार बॉम्बस्फोट झाला होता.

संशयावरून केली कारवाई

काबुलमध्ये झालेल्या या स्फोटामागे आयसीस-खुरासान या दहशतवादी संघटनेचा हात असल्याच्या संशयावरून तालिबान सरकारने त्या संघटनेच्या तळांवर हल्ले केले आहेत. या हल्ल्यात आयसीसचे काही दहशतवादी मारले गेल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तालिबानकडून मात्र याबाबत कुठलीही आकडेवारी जाहीर करण्यात आलेली नाही. अफगाणिस्तानमध्ये तालिबानची सत्ता आल्यापासून झालेल्या अनेक हल्ल्यांमध्ये आयसीस-खुरासान संघटनेचा हात असल्यामुळेच तालिबानकडून ही कारवाई करण्यात आल्याची चर्चा आहे.

काय आहे प्रकरण?

अफगाणिस्तानमध्ये तालिबानची सत्ता आल्यानंतर तालिबानविरोधी दहशतवादी गट सक्रीय झाले आहेत. काही ना काही कुरापती करून तालिबानला विरोध दर्शवण्याचा प्रयत्न या संघटना करत आहेत. या स्फोटाची जबाबदारी अद्याप कुठल्याही संघटनेनं स्विकारलेली नाही. काबुलच्या ईदगाह मशिदीत तालिबानी प्रवक्ता जबीउल्लाह मुजाहिद  यांच्या आईची शोकसभा सुरु होती. तालिबानशी संबंधित अनेक नागरिक या सभेत उपस्थित होते.

हे वाचा - मोठी बातमी: पुन्हा एकदा Cordelia क्रूझवर धाड, 8 जण ताब्यात

प्रत्यक्षदर्शींच्या प्रतिक्रिया

मशिदीतून स्फोटाचा जोरदार आणि धमाकेदार आवाज ऐकू आल्याची प्रतिक्रिया या मशिदीच्या परिसरातील दुकानदारांनी दिली आहे. अगोदर स्फोटाचे आणि त्यानंतर गोळीबाराचेही काही आवाज ऐकू आले. स्फोटानंतर तातडीने हा रस्ता ब्लॉक करण्यात आला. अनेक ऍब्युलन्स या ठिकाणी दाखल झाल्या आणि जखमींना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेल्या. या स्फोटात आतापर्यंत पाच जण ठार झाले आहेत, तर अनेकजण जखमी आहेत.

या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कुठल्याही संघटनेनं स्विकारलेली नाही. मात्र आयसीस खुरासान या संस्थेनंच हा धमाका घडवून आणला असावा, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. तालिबानचं सरकार अफगाणिस्तानमध्ये आल्यापासून ही संघटना सक्रीय झाली आहे.

First published:

Tags: Afghanistan, Bomb Blast, Taliban