मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

काबूलमध्ये तालिबाननं पुन्हा पाडला महिलेच्या रक्ताचा सडा; चिमुकल्यालाही केलं रक्तबंबाळ

काबूलमध्ये तालिबाननं पुन्हा पाडला महिलेच्या रक्ताचा सडा; चिमुकल्यालाही केलं रक्तबंबाळ

तालिबाननं पुन्हा नागरिकांवर हल्ला केला आहे. (फोटो- मार्कस यम)

तालिबाननं पुन्हा नागरिकांवर हल्ला केला आहे. (फोटो- मार्कस यम)

तालिबाननं अफगाणिस्तानावर आपला ताबा (Taliban Control Afghanistan) मिळवल्यानंतर देशातील स्थिती अत्यंत बिकट बनत चालली आहे. तालिबानी बंडखोरांच्या हिंसाचाराच्या (Taliban Violence) अनेक घटना समोर येत आहेत.

  • Published by:  News18 Desk
काबूल, 18 ऑगस्ट: तालिबाननं अफगाणिस्तानावर आपला ताबा (Taliban Control Afghanistan) मिळवल्यानंतर देशातील स्थिती अत्यंत बिकट बनत चालली आहे. असंख्य लोकं देश सोडण्यासाठी धडपड करत आहेत. अशात तालिबानी बंडखोरांच्या हिंसाचाराच्या (Taliban Violence) अनेक घटना समोर येत आहेत. यानंतर काबूल विमानतळ परिसरात तालिबान संघटनेच्या काही बंडखोरांनी अफगाण नागरिकांवर अंदाधुंद गोळीबार (Taliban Firing) केल्याची घटना समोर आली आहे. या गोळीबारात महिलांसह काही लहान लेकरं देखील जखमी झाले आहेत. शांतता राखण्याचं वचन दिल्यानंतरही हिंसाचाराची ही घटना समोर आली आहे. या घटनेचे काही फोटोज सध्या सोशल मीडियात वेगानं व्हायरल होतं आहेत. या फोटोंत स्पष्टपणे दिसत आहे की, देश सोडून जाण्याच्या उद्देशानं जमलेल्या महिला आणि लहान मुलांवर तालिबान्यांनी हल्ला केला आहे. या हल्ल्यात एका महिलेसह तिचा मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडला आहे. तालिबान बंडोखोरांनी विमानतळावरून जमावाला माघारी लावण्यासाठी गोळीबार देखील केल्याची माहिती समोर आली आहे. लॉस एंजेलिस टाइम्सचे रिपोर्टर मार्कस यम यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून हे फोटो ट्वीट केले असून फोटोतील जखमी लोकं तालिबानच्या हल्ल्यात रक्तबंगाळ केल्याचा दावा केला आहे. हेही वाचा-अफगाणिस्तानच्या स्पेशल फोर्सचा जवान दिल्लीत विकतोय फ्रेंच फ्राईज; म्हणाला... याव्यतिरिक्त फॉक्स न्यूजनं एक व्हिडीओदेखील जारी केला आहे, ज्यामध्ये दावा करण्यात आला आहे की, तालिबान बंडखोर काबूलच्या रस्त्यावर विविध ठिकाणी फिरत आहेत. ते माजी सरकारी कर्मचाऱ्यांचा शोध घेत आहेत. या दरम्यान ते अनेक ठिकाणी गोळीबार देखील करत आहेत. वृत्तवाहिनीनं असाही दावा केला की, तालिबाननं मंगळवारी तखर प्रांतात एका महिलेची हत्या केली आहे. संबंधित महिला तोंड उघडं ठेवून घराबाहेर आली होती. त्यामुळे तालिबान्यांनी हा हल्ला केला आहे. हेही वाचा-देशासाठी तालिबानसोबत लढणाऱ्या सलिमाला अखेर अटक; शेवटच्या क्षणापर्यंत दिली झुंज काबूल ताब्यात घेतल्यानंतर तालिबाननं पत्रकार परिषदेत सांगितलं की, ते 1996-2001 दरम्यानच्या त्यांच्या आधीच्या राजवटीच्या तुलनेत यावेळी कायदा सौम्य कायदे लागू करणार आहेत. त्याचबरोबर महिलांना काम करण्याचा आणि शिक्षणाचा अधिकार मिळेल, असंही तालिबानी प्रवक्त्यानं सांगितलं आहे. समाजातही महिलांची सक्रिय भूमिका राहिल पण ती शरिया कायद्यानुसार, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
First published:

Tags: Afghanistan, Taliban

पुढील बातम्या