Home /News /videsh /

कुख्यात दहशतवादी झाला अफगाणिस्तानचा नवा संरक्षण मंत्री; 'या' कारणामुळे 6 वर्ष होता अमेरिकेच्या कैदेत

कुख्यात दहशतवादी झाला अफगाणिस्तानचा नवा संरक्षण मंत्री; 'या' कारणामुळे 6 वर्ष होता अमेरिकेच्या कैदेत

अफगाणिस्तानात परतलेल्या तालिबानने अफगाणिस्तानचे अंतरिम संरक्षण मंत्री (New Defense Minister of Afghanistan) म्हणून ग्वांतानामो बे कारागृहाचा माजी कैदी मुल्ला अब्दुल कय्यूम झाकीर (Abdul Qayyum Zakir) याची नियुक्ती केली आहे.

    काबूल 26 ऑगस्ट : काबूल ताब्यात घेतल्यानंतर आता तालिबान्यांनी (Taliban Regains Control of Afghanistan) सरकार स्थापनेची कसरत सुरू केली आहे. सरकार स्थापनेपूर्वी तालिबान अफगाणिस्तान चालवण्यासाठी विविध खात्यांच्या प्रमुखांची नियुक्ती करत आहे. या अनुक्रमात तालिबानने देशाच्या संरक्षण विभागाची कमांड जगातील सर्वात धोकादायक कारागृहातील कैदी आणि शांतता चर्चेला विरोध करणाऱ्या एका दहशतवाद्याकडे (Terrorist) सोपवली आहे. 20 वर्षांनंतर अफगाणिस्तानात परतलेल्या तालिबानने अफगाणिस्तानचे अंतरिम संरक्षण मंत्री (New Defense Minister of Afghanistan) म्हणून ग्वांतानामो बे कारागृहाचा माजी कैदी मुल्ला अब्दुल कय्यूम झाकीर (Abdul Qayyum Zakir) याची नियुक्ती केली आहे. मुल्ला अब्दुल कय्यूम झाकीर एक अनुभवी तालिबान कमांडर आणि तालिबान संस्थापक मुल्ला उमरचा जवळचा सहकारी असल्याचे सांगितले जाते. रॉयटर्सच्या म्हणण्यानुसार, अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटरवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर 2001 मध्ये अमेरिकेच्या नेतृत्वाखालील सैन्याने त्याला पकडले होते आणि 2007 पर्यंत ग्वांतानामो खाडीच्या तुरुंगात ठेवले होते. नंतर त्याला सोडण्यात आले आणि अफगाणिस्तान सरकारच्या ताब्यात देण्यात आले. मुल्ला अब्दुलची गणना तालिबानच्या भयानक दहशतवाद्यांमध्ये केली जाते. ग्वांतानामो बे हे क्यूबामधील एक उच्च सुरक्षा असलेले अमेरिकन लष्करी तुरुंग आहे जेथे हाय प्रोफाईल दहशतवाद्यांना कैदेत ठेवले जाते. वेगानं बदलतंय आशियातलं राजकारण, चीन आणि तालिबानची पहिली Diplomatic बैठक अफगाणिस्तानमध्ये तालिबानने अद्याप औपचारिक सरकार स्थापन केले नसले, तरी दहशतवादी गटाने देश चालवण्यासाठी आपल्या काही नेत्यांना महत्त्वाच्या पदांवर नियुक्त केले आहे. या अनुक्रमात हाजी मोहम्मद इद्रिस याची देशाच्या मध्यवर्ती बँक, अफगाणिस्तान बँकचे 'कार्यवाहक प्रमुख' म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तालिबानचे प्रवक्ते झबीहुल्ला मुजाहिद यांनी या वृत्ताला दुजोरा देत सांगितले की, इद्रिसची नियुक्ती सरकारी संस्था आणि बँकिंग समस्या सुलभ करण्याच्या आणि लोकांच्या समस्या दूर करण्याच्या उद्देशाने करण्यात आली आहे. अफगाणिस्तानची वृत्तसंस्था पझवोकच्या म्हणण्यानुसार, तालिबानने गुल आगाचे नाव कार्यकारी अर्थमंत्री म्हणून तर सदर इब्राहिमला कार्यवाहक गृहमंत्री म्हणून घोषित केलं आहे. गंभीर! भारताचा VISA असलेले अफगाणी पासपोर्ट चोरीला, दहशतवादी करू शकतात दुरुपयोग अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर आणण्यासाठी तालिबान विद्वान, तज्ज्ञ आणि तांत्रिक तज्ज्ञांना कामावर परतण्यासाठी राजी करण्याचा प्रयत्न करत आहे. अनेक वरिष्ठ अधिकारी आणि आधीच्या अफगाणिस्तान सरकारमधील लोक लपलेले किंवा निर्वासित झालेले आहेत. हेच कारण आहे की तालिबानने अशा लोकांना देश सोडू नये असे सांगितले आहे आणि अफगाणिस्तानात राहण्याचे आणि काम करण्याचे आवाहन केले आहे.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Afghanistan, Taliban

    पुढील बातम्या