आशियातही आता 'गे मॅरेज' कायदेशीर! 'या' देशानं दिली समलिंगी विवाहाला मान्यता

समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता देणाऱ्या देशांच्या यादीत आता आशियातला पहिला देश आला आहे.

News18 Lokmat | Updated On: May 17, 2019 04:09 PM IST

आशियातही आता 'गे मॅरेज' कायदेशीर! 'या' देशानं दिली समलिंगी विवाहाला मान्यता

नवी दिल्ली, 17 मे : समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता देणाऱ्या देशांच्या यादीत आता आशियातला पहिला देश आला आहे. तैवानने या दृष्टीने शुक्रवारी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचचलं. आशिया खंडातला समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता देणारा पहिला देश तैवान ठरला आहे.

तैवानच्या विधिमंडळाने समलिंगी जोडप्यांना एक कायमस्वरूपी संघटना स्थापन करण्याची परवानगी दिली आहे. तसंच असा विवाह करू इच्छिणाऱ्यांना शासकीय विवाह नोंदणी कार्यालयात अर्ज सादर करण्याचीही परवानगी दिली असल्याची माहिती तैवानचे शासकीय अधिकारी अल जझेरा यांनी दिली आहे.


सावधान! फ्रेंच किसचे आहेत गंभीर परिणाम, रिसर्चमध्ये आलं समोर

हा निर्णय तैवानच्या संविधानाचं उल्लंघन करणारा असल्यामुळे त्यात दुरुस्ती करणं गरजेचं आहे. त्यासाठी तैवानच्या सर्वोच्च न्यायालयाने विधिमंडळाला 24 मे पर्यंत अंतिम मुदत दिली आहे. यासाठी पार पडलेल्या मतदानापूर्वी मुसळधार पाऊस असूनही तैवानची राजधानी तैपईतील संसदेच्या इमारतीबाहेर शेकडो समलिंगी जोडप्यांनी गर्दी केली होती.

Loading...

तर मतदानाला सुरुवात होण्याअगोदर तैवानचे राष्ट्राध्यक्ष त्सई इंग-वेन यांनी हा विषय केवळ आता समलिंगी लोकांच्याच बाबतीतला राहिला नसून तो लाखो कुटुंबं, पिढ्या आणि धार्मिक गटांमध्येही गेला असल्याचं म्हटलं आहे.


डोक्यावरचं टेन्शन तुम्हाला दूर करायचं असेल तर 'या' 5 गोष्टी कराच

तर, इतिहास बदलण्याची आणि प्रगतीच्या दिशेने वाटचाल करण्याची आज आमच्यासमोर संधी आहे. यामुळे पूर्व आशियायी खंडात नक्कीच आमूलाग्र बदल घडून येईल असा विश्वास अनेकांनी व्यक्त रेला आहे.

या निर्णयामुळे तैवानमधील रुढीवादी परंपरेला धक्का बसणार असल्यामुळे ज्यांनी हा कायदा पास होऊ नये यासाठी विरोध केला त्यांना मतदान प्रक्रियेत पुरेशी मते न मिळाल्याने ते अपयशी ठरल्याची माहिती आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 17, 2019 04:09 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...